![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/11/Untitled-design-14-380x214.jpg)
Chandra Grahan 2022 Time In India: वर्षातील शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण (Chandra Grahan) 8 नोव्हेंबर 2022 रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण भारतात दिसणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, हा दिवस कार्तिक महिन्याची पौर्णिमा (Kartik Purnima 2022) देखील आहे. देव दीपावली (Dev Deepavali) देखील कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते. पण यंदा पौर्णिमेला चंद्रग्रहण असल्यामुळे देव दीपावली एक दिवस आधी म्हणजेच 7 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे.
भारतात, वर्षातील शेवटचे आणि दुसरे चंद्रग्रहण देशाची राजधानी दिल्लीसह गुवाहाटी, रांची, पाटणा, सिलीगुडी आणि कोलकाता येथेही दिसणार आहे. भारतात दिसणारे चंद्रग्रहण असल्याने या काळात विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. (हेही वाचा -Chandra Grahan 2022 Dos and Don'ts: चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी काय आहे? सुतक काळात करू नका 'या' चुका, अन्यथा आयुष्यभर होईल पश्याताप)
चंद्रग्रहण 2022 कोणत्या शहरात किती वाजता दिसेल?
रांची: संध्याकाळी 5:07 ते 6:18 पर्यंत
पाटणा: संध्याकाळी 5:05 ते 6:18 पर्यंत
कोलकाता: दुपारी 4:56 ते संध्याकाळी 6:18
भुवनेश्वर: संध्याकाळी 5:10 ते 6:18 पर्यंत
रायपूर: संध्याकाळी 5:25 ते 6:18 पर्यंत
नवी दिल्ली: संध्याकाळी 5:32 ते 6:18 पर्यंत
इटानगर: दुपारी 4:28 ते 6:18 पर्यंत
गुवाहाटी: दुपारी 4:37 ते 6:18 पर्यंत
विशाखापट्टणम: संध्याकाळी 5:24 ते 6:18 पर्यंत
गंगटोक: संध्याकाळी 4:48 ते 6:18 पर्यंत
प्रयागराज : संध्याकाळी 5:18 ते 6:18
कानपूर: संध्याकाळी 5:23 ते 6:18 पर्यंत
हरिद्वार: संध्याकाळी 5:26 ते 6:18 पर्यंत
धर्मशाळा: संध्याकाळी 5:30 ते संध्याकाळी 6:18
चंदीगड: संध्याकाळी 5:31 ते 6:18 पर्यंत
जम्मू: संध्याकाळी 5:35 ते 6:18 पर्यंत
नागपूर : संध्याकाळी 5:36 ते 6:18
भोपाळ : संध्याकाळी 5:40 ते 6:18 पर्यंत
जयपूर: संध्याकाळी 5:41 ते 6:18 पर्यंत
बेंगळुरू: संध्याकाळी 5.53 ते संध्याकाळी 6:18
नाशिक : सायंकाळी 5:55 ते 6:18
अहमदाबाद : संध्याकाळी 6:00 ते संध्याकाळी 6:18
चेन्नई: संध्याकाळी 5:42 ते 6:18 पर्यंत
हैदराबाद: संध्याकाळी 5:44 ते 6:18 पर्यंत
उज्जैन: संध्याकाळी 5:47 ते 6:18 पर्यंत
जोधपूर: संध्याकाळी 5:53 ते 6:18 पर्यंत
पुणे : संध्याकाळी 6:01 ते 6:18 पर्यंत
सुरत : संध्याकाळी 6:02 ते 6:18 पर्यंत
जामनगर : संध्याकाळी 6:11 ते 6:18 पर्यंत
तिरुवनंतपुरम: संध्याकाळी 6:02 ते 6:18 पर्यंत
मुंबई: संध्याकाळी 6:05 ते 6:18 पर्यंत
पणजी: संध्याकाळी 6:06 ते 6:18 पर्यंत
श्रीनगर: श्रीनगरमधील ग्रहण चंद्र संध्याकाळी 05:31 वाजता सुमारे 66 टक्के अपारदर्शकतेसह क्षितिजाच्या वर येईल.
दरम्यान, चंद्रग्रहणाचा सुतक कालावधी 9 तास आधी सुरू होतो. त्यामुळे 08 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या चंद्रग्रहणाचा सुतक काल सकाळी 08.21 पासून सुरू होईल. सुतक ग्रहणाच्या आधी 3 प्रहरांना साजरा केला जातो. चंद्रग्रहणाच्या सुतक काळात देवाच्या मूर्तींना हात लावणे, पूजा करणे टाळावे. सुतक काळात गर्भवती महिला, वृद्ध आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी.