World Asteroid Day 2021: कधी साजरा केला जातो लघुग्रह दिवस? जाणून घ्या या दिवसाचे महत्त्व आणि इतिहास
Asteroid Day 2021 | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

अवकाश, ग्रह, तारे एकंदर खगोलशास्त्रात तुम्हाला रस असेल तर तुम्हाला लघुग्रह दिन याबद्दल नक्कीच माहिती असेल. दरवर्षी 30 जून रोजी जागतिक लघुग्रह दिवस (World Asteroid Day 2021) साजरा केला जातो. 1908 मध्ये झालेल्या Siberian Tunguska या घटनेनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. यादिवशी जगभरातील लोकांना लघुग्रहामुळे होणाऱ्या परिणांमाबद्दल माहिती देऊन जागरुक केले जाते. यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. (Earth Day: जागतिक पृथ्वी दिना निमित्त टाळा पर्यावरणाचा -हास करणा-या 'या' गोष्टी आणि जपा वसुंधरेचे पावित्र्य)

लघुग्रह दिवसाची सुरुवात कधी आणि कशी झाली?

लघूग्रह दिवस दरवर्षीप्रमाणे यंदाही 30 जून रोजी साजरा करण्यात येत आहे. प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ Stephen Hawking, फिल्म निर्माते Grigorij Richters, संगीतकार Dr Brian May, अपोलो 9 चे अंतराळवीर Rusty Schweickart आणि B612 फाऊंडेशनचे अध्यक्ष डॅनिका रेनी या सर्वांनी मिळून लोकांना लघुग्रहाबद्दल माहिती देण्यासाठी लघुग्रह दिवसाची सुरुवात केली.

लघुग्रह दिन साजरा करण्यात येणार असल्याची घोषणा 3 डिसेंबर 2014 रोजी करण्यात आली. 2016 मध्ये युनायटेड नेशन्सच्या जनरल असेंबली मध्ये 30 जून हा लघुग्रह दिन म्हणून स्वीकारण्यात आला. (World Water Day 2021: 'जागतिक जल दिन' का साजरा केला जातो? जाणून घ्या या मागील इतिहास आणि काही रोचक तथ्य)

पृथ्वीच्या इतिहासातील सर्वात मोठा लघुग्रह अपघात Siberian Tunguska मध्ये झाला होता. यादिनी लघुग्रहांबद्दल माहिती देणारे आणि त्यांच्याबद्दल जागरुकता निर्माण करणारे अनेक कार्यक्रम जगभरात आयोजित केले जातात. यापैकी बहुतांश कार्यक्रम हे म्युझियम, विद्यापीठं, शाळा आणि अवकाश संस्थांकडून सर्व वयोगटातील लोकांसाठी खुले असतात.