
विठ्ठल- रूक्मिणीच्या भक्तांसाठी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) हा वर्षातला सर्वात खास दिवस असतो. यंदा आषाढीला मागील 2 वर्षांप्रमाणे कोविड 19 नियमांचं बंधन नसल्याने सेलिब्रेशनला उधाण असणार आहे. 10 जुलै, रविवारी यंदा आषाढी एकादशी अर्थात देवशयनी एकादशी (Devshayani Ekadashi) साजरी केली जाणार असल्याने या दिवसाच्या निमित्ताने वारकरी मित्रांना, विठू माऊलींच्या भक्तांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा खास मराठमोळ्या शुभेच्छा, Facebook Messages, Wishes, Greetings, HD Images द्वारा शेअर करत या दिवसाचा आनंद द्विगुणित करा. हे देखील नक्की वाचा: Pandharpur Vitthal Rukmini Live Darshan: आषाढी एकादशीला JIO TV App देणार विठ्ठल रूक्मिणीचं 24 तास लाईव्ह दर्शन .
पंढरपूरच्या विठ्ठल-रखुमाईच्या मंदिरापासून गल्लीबोळ्यातील विठ्ठल मंदिरं देखील आषाढी एकादशीच्या निमित्ताने उजळून निघतात. मागील दोन वर्ष आषाढीला देव आणि भक्तांमध्येही अंतर पडलं होतं पण यंदा ही कसर सारेच भक्तमंडळी भरून काढणार आहेत मग या आषाढीच्या निमित्ताने तुमच्या मित्रमंडळींचा, प्रियजणांचा दिवस थोडा करा.
आषाढी एकादशीच्या शुभेच्छा

सोहळा जमला आषाढी वारीचा
सण आला पंढरीचा
मेळा जमला भक्तगणांचा ,ध्यास
विठुमाऊलीच्या दर्शनाचा
आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा

हेची दान देगा देवा
तुझा विसर न व्हावा
देवशयनी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

आषाढी एकादशी निमित्त
तुमच्या मनातील सार्या इच्छा,आकांक्षा पूर्ण होवोत
हीच आमची शुभकामना!

विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा
हरे चिंता, व्यथा क्षणार्धात
सोड अहंकार सोड तू संसार
क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून ....
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

सावळे सुंदर रूप मनोहर
राहो निरंतर हृदयी माझे !
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा
आषाढी एकादशी हा दिवस देवशयनी एकादशी म्हणून देखील ओळखला जातो. या दिवशी विष्णू देव पुढील 4 महिन्यांसाठी निद्रावस्थेमध्ये जातात अशी भक्तांची धारणा आहे. त्यामुळे आषाढी ते कार्तिकी एकादशी असा चार महिन्यांचा चातुर्मास देखील पाळला जातो. या चातुर्मासामध्ये काही घरांमध्ये कांदा, लसूण, मांसाहार टाळला जातो. एकादशीच्या निमित्त एक दिवसाचं व्रत पाळलं जातं. त्या निमित्ताने हलका आहार, दूध, फळं दोन वेळेस खाण्याचा नियम असतो.