Vinayaki | PC: File Image

हिंदू धर्मीयांसाठी शुक्ल पक्षातील चतुर्थीचा दिवस हा विनायक चतुर्थीचा (Vinayak Chaturthi) दिवस असतो. आज (13 जुलै) आषाढ महिन्यातील विनायकी चतुर्थी आहे. योगायोगाने ही चतुर्थी आणि मंगळवारचा दिवस एकत्र आल्याने हा अंगारक योग बनला आहे. मंगळवार हा गणपती बाप्पाचा दिवस असल्याने या दिवसाचं गणेशभक्तांमध्ये विशेष महत्त्व आहे. यंदा आषाढ महिन्यातील विनायकी आणि संकष्टी या चतुर्थी अंगारक योग असल्याने बाप्पांच्या भाविकांमध्ये त्याबद्दल विशेष महत्त्व आहे. या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा तुमच्या प्रियजणांना, नातेवाईकांना देऊन आजचा दिवस खास करायचा असेल तर विनायकी चतुर्थीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी ग्रिटिंग्स, शुभेच्छापत्र, Messages, Wishes सोशल मीडीयात Facebook, Twitter, Instagram, WhatsApp Status द्वारा नक्की शेअर करा.

धार्मिक मान्यतांनुसार, गणेश भक्त बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी, आयुष्यातील संकटं, कष्ट कमी करण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी व्रत करतात. पूजा-अर्चना करतात. गणपती हा अधिपती आणि विघ्नहर्ता असल्याने त्याच्या पूजनाला विशेष महत्त्व आहे. नक्की वाचा: July 2021 Festivals Calendar: आषाढी एकादशी, बेंदूर, गुरूपौर्णिमा ते अंगारक संकष्टी चतुर्थी यंदा कधी?

विनायकी चतुर्थीच्या शुभेच्छा

Ashadhi Vinayaki | File Image
Ashadhi Vinayaki | File Image
Ashadhi Vinayaki | File Image
Ashadhi Vinayaki | File Image
Ashadhi Vinayaki | File Image

यंदा आषाढ महिन्यातील संकष्टी चतुर्थी देखील अंगारक योगामध्ये आहे. 27 जुलै दिवशी मंगळवारी ही संकष्टी आहे. अंगारक संकष्टी चतुर्थीचा योग सामान्यपणे वर्षातून केवळ दोनदा सहा महिन्यांच्या फरकाने येत असल्याने बाप्पाच्या भाविकांमध्ये त्याबद्दल विशेष उत्सुकता असते. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात मंदिरांना टाळं लावण्यात आल्याने यावर्षी अंगारकीला गणरायाचं दर्शन देवळामध्ये घेणं शक्य नाही पण घरच्या घरी तुम्ही नक्कीच बाप्पाची पूजा करून प्रार्थना करू शकता.