April Fools Pranks: 1 एप्रिलच्या दिवशी मित्रमैत्रिणींवर, ऑफिसमध्ये जवळच्या व्यक्तींवर 'एप्रिल फूल'डे प्रॅन्क्स (April Fools Pranks) करण्याची मज्जा काही और असते. तुमच्या अगदीच जवळच्या व्यक्ती असतील तर तुम्हांला ते कसे रिअॅक्ट करतील याचा थोडाफार अंदाज असतो. पण ऑफिसमध्ये तुमचे साथीदार कधी काय करतील? याचा नेम नाही. एक एप्रिलला यंदा तुमचा 'पोपट' होऊ नये म्हणून काही गोष्टींबाबत तुम्ही सतर्क राहू शकता. वेळीच तुम्हांला समजलं तुम्ही एप्रिल फूल्स डे प्रॅन्क मध्ये अडताय तर तो प्रॅन्क तुम्ही स्मार्टली समोरच्या व्यक्तीवर उलटवून किंवा अपेक्षेप्रमाणे रिअॅक्ट न करता तुम्ही समोरच्या व्यक्तीलाच 'एप्रिल फूल' बनवू शकता. पण हे नेमकं ओळखायचं कसं? April Fools Pranks: मित्रांना, जवळच्या व्यक्तींना 1 एप्रिल दिवशी नक्की 'FOOL' करतील असे प्रॅन्क
एप्रिल फूल्स डे
1. अलर्ट रहा
कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीमुळे तुमचा 'पोपट' होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याच मोहात पडू नका. किमान 1 एप्रिल दिवशी थोडे जास्त अलर्ट रहा.
2. प्रत्येक गोष्टींचा विचार करा
कोणत्याही गोष्टीवर सरळ विश्वास ठेवण्याआधी ती गोष्ट तुम्हांला पटतेय का? याचा विचार करून बघा. 2-3 वेळेस ही गोष्ट शक्य आहे का? हे तपासून पहा. तुमच्या जवळची व्यक्ती/ ऑफिसमधील कलिग खूपच चांगलं वागत असेल, अचानक कुणीतरी अनपेक्षितपणे तुम्हांला फोन करत असेल, अचानक भेटण्याचं प्लॅन असतील तर त्यावर सरळ विश्वास ठेवण्याआधी त्याबद्दल विचार करा.
3.अनोळखी फोनला उत्तर देणं/ रिप्लाय देणं टाळा
फोनचा प्रॅन्कसाठी वापर करून हमखास तुमचा 'पोपट' केला जाऊ शकतो. त्यामुळे शक्यतो अनोळखी नंबरवरून आलेल्या फोनवर उत्तरं देताना थोडं सावध रहाणं गरजेचे आहे. डिस्काऊंट्स, नोकरीची संधी अशा भूरळ पाडणार्या गोष्टींवर विश्वास ठेवण्याआधी थोडा विचार करून पहा. स्पॅम मेलदेखील असू शकतात.
4. रिअॅक्ट करणं टाळा
तुम्ही प्रॅन्कमध्ये अडकलाय याचा थोडाफार अंदाज ठराविक वेळेनंतर येतोच. मग जर तुमच्याही ते लक्षात आलं तर त्याला रिअॅक्ट करणं टाळा. काही झालंच नाही असा दाखवा आणि तिथून निघून जा. तुमच्यावर केलेला प्रॅन्क यशस्वी झालाय की नाही? याचा त्यालाच विचार करायला लावून गोंधळात टाका.
5. एकांतात रहा
शक्य असेल आणि तुमचा आज 'बकरा' होणार असा तुम्हांला अंदाज असेल तर शक्यतो त्या मित्रांपासून थोड लांबच रहा. लांब राहूनच तुम्हांला प्रॅन्क टाळता येऊ शकत असेल तर असं करण्यातच तुमचं आज हित आहे.
April Fool 2020: एप्रिल फूल च्या शुभेच्छा देण्यासाठी खास मराठी शुभेच्छापत्र, संदेश : Watch Video
एक एप्रिलच्या सेलिब्रेशनची मज्जाच तुमच्या जवळच्या व्यक्तींची थोडी मज्जा मस्ती करण्यामध्ये आहे. मग आजचा तर तो दिवस हक्काचा आहे. पण ही मस्ती करताना समोरच्याच्या व्यक्तीच्या भावनांचाही आदर राखा विनाकारण मस्करीची कुस्करी करू नका. वेळ, स्थिती याचं भान राखून एप्रिल फूल्स डे प्रॅन्क करा.