Ganesh Visarjan| File Image

अनंत चतुर्दशी (Anant Chaturdashi) म्हणजे बाप्पाच्या विसर्जनाचा दिवस. दहा दिवस भक्तांकडून सेवा करून घेतल्यानंतर भाद्रपद शुद्ध चतुर्दशीच्या दिवशी गणराज आपल्या घरी परतात. गणेशभक्त भक्त देखील साश्रू नयनांनी बाप्पाचा निरोप घेतात. यंदा कोविडच्या नियमावलीचं पालन करत बाप्पाला निरोप देताना अनावश्यक गर्दी टाळत आणि शक्य असल्यास जेथे बाप्पा विरजमान आहे तेथेच त्याला विसर्जित करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. मग ढोल ताशे, भव्य मिरवणूका टाळत बाप्पाला निरोप देताना पुढल्या वर्षीचं आमंत्रण देताना काही विसर्जनाची घोषवाक्य, Quotes आणि प्रार्थनेच्या ओळी म्हणत या क्षणाला थोडं स्पेशल करा. नक्की वाचा: Ganesh Visarjan 2021 At Home: घरच्या घरी POP गणेशमूर्तीचं देखील पर्यावरणपूरक विसर्जन कसं कराल?

गणपती बाप्पा ही विद्येची देवता तसेच विघ्नहर्ता आहे. यंदा त्याच्या विसर्जनासोबतच बाप्पा प्रत्येक गणेशभक्तांच्या आयुष्यातील दु:ख, संकटं कमी करेल अशी कामना करत आज बाप्पाला निरोप द्यायला विसरू नका. Anant Chaturdashi 2021 Visarjan Muhurat: अनंत चतुर्दशी दिवशी बाप्पाला निरोप देण्यासाठी दिवसभरातील पहा कोणत्या आहेत शुभ वेळा?

अनंत चतुर्दशी गणेश विसर्जन स्लोगन

  • एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार

 

  • गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या

Ganesh Visarjan Status | File Photo
Ganesh Visarjan Status | File Photo

  • गणपती गेले गावाला

    चैन पडेना आम्हाला

    गणपती बाप्पा मोरया

Ganpati Visarjan Quotes (Photo Credits: File Image)

  • निरोप देतो आता

    देवा आज्ञा असावी

    चुकले आमचे काही देवा

    क्षमा असावी...

    गणपती बाप्पा मोरया!

Ganpati Visarjan Quotes (Photo Credits: File Image)

गणपती बाप्पाला आज निरोप दिल्यानंतर पुढल्या वर्षी बाप्पा परत 31 ऑगस्ट 2022 दिवशी दिवशी त्यांच्या भक्तांकडे परतणार आहे. मागील दहा दिवसांंच्या त्यांच्या सेवेमधून मिळालेल्या उर्जेचा, सकारत्मकेचा आता वर्षभर वापर करून बाप्पाच्या पुढल्या वर्षीच्या आगमनाची तयारी करा.