
गणेशोत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) सणाने होते. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते चतुर्दशी असे दहा दिवस गणरायाचा पाहुणचार केल्यानंतर बाप्पा आपल्या गावी जायला निघतात. यंदा अनंत चतुर्दशीचा सण 9 सप्टेंबर दिवशी साजरा केला जाणार आहे. या निमित्ताने तुमच्या मित्रमंडळींना, नातेवाईकांना, आप्तांना अनंत चतुर्दशी सणाच्या WhatsApp Status, Wishes, Messages, Greetings, HD Images द्वारा शेअर करून या सणाचा आनंद द्विगुणित करायला विसरू नका.
लोकमान्य टिळकांनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीत राष्ट्रीय हेतूने गणेशोत्सव सुरू केला आणि त्याचा कालावधी 10 दिवसांचा ठेवला होता. त्यानुसार अनंत चतुर्दशीला महाराष्ट्रात दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. पण अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंच्या पूजनाने हा दिवस साजरा करण्याची देखील रीत आहे. Anant Chaturdashi: अनंत चतुर्दशी दिवशी का केले जाते गणपती बाप्पाचे विसर्जन, जाणून घ्या त्यामागची दंतकथा
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा

दाटला जरी कंठ तरी
निरोप देतो तुला हर्षाने
माहीत आहे मला देवा..
पुन्हा येणार तु वर्षाने..
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
अनंत चतुर्दशीच्या शुभेच्छा!

गणपती बाप्पा मोरया
पुढल्या वर्षी लवकर या
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

अनंत चतुर्दशीचं मंगल पर्व तुमच्या घरी
आनंद, सुख, समृद्धी घेऊन येवो
हीच कामना
अनंत चतुर्दशीच्या हार्दिक शुभेच्छा!

यंदा कोरोना संकटानंतर 2 वर्षांनी पुन्हा गाजत वाजत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यामुळे बाप्पाच्या आगमनासोबतच अनंत चतुर्दशीला बाप्पाच्या विसर्जन मिरवणूकीची देखील धामधूम पहायला मिळत आहे. भाविक जड अंतकरणाने बाप्पाला निरोप देताना पुढल्या वर्षी लवकर येण्याचं आमंत्रण देखील देतात.