Akshay Tritiya Wishes in Marathi: हिंदू धर्मियांच्या दृष्टीने शुभ आणि मंगलमय अशा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस म्हणजे अक्षय तृतीया/ अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya). यंदा 3 मे दिवशी अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. हा शुभ दिवस वैशाख शुद्ध तृतीया दिवशी साजरा केला जातो. या दिवसाच्या निमित्ताने अनेक मंगलकार्याची सुरूवात केलीच जाते पण या दिवशी दिलेलं दान देखील अक्षय्य राहतं अशी धारणा असल्याने अनेकजण आपल्या कुवतीनुसार या दिवशी विविध गोष्टींचे दान देतात. यामध्ये पाणी, अन्न, रक्त ते विविध वस्तू, रूग्णालयांमध्ये, वृद्धाश्रमामध्ये फळांचे वाटप करण्यापर्यंत अनेक प्रकारचे दान केले जाते. मग या मंगलदायी दिवसाची सुरूवात तुमच्या आयुष्यातील नातेवाईक, मित्रमंडळी, प्रियजण यांचीही आनंददायी होण्यासाठी ही खास मराठमोळी ग्रीटिंग्स, शुभेच्छापत्रं, Wishes, Messages, GIFs शेअर करून आनंद द्विगुणित करू शकता.
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक दिवस असल्याने अनेकजण या दिवसाचं औचित्य साधत सोनं खरेदी देखील करतात. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा केली जाते. लक्ष्मीला सोन्याच्या स्वरूपात प्रतिकात्मक स्वरूपात घरी आणण्यासाठी एखादा सोन्याचा किंवा चांदीचा दागिना विकत घेतला जातो. आजकाल सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याचे प्रमाणही वाढले आहे. हे देखील नक्की वाचा: Akshaya Tritiya 2022: केवळ सोनेच नाही तर अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ‘या' वस्तू घरात आणल्यास संपत्तीमध्ये होते वाढ, जाणून घ्या .
अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा
अक्षय्य तृतीयेच्या मंगलदिनी
तुमच्या आयुष्यात सुख, शांती,समाधान नांदो
या मनोकामनेसह तुम्हांला आणि तुमच्या
परिवाराला या मंगलदिनाच्या हार्दिक शुभेच्छा
नोटांनी भरलेला असो तुमचा खिसा,
आनंदाने भरलेला असो संसार
या अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्हाला मिळो,
सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव
अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेछा
अक्षय राहो धनसंपदा,
अक्षय राहो शांती..
अक्षय राहो मनामनातील,
प्रेमळ निर्मळ नाती..
अक्षय तृतीयेच्या मनपूर्वक शुभेच्छा!
तुमच्या घरात धनाचा पाऊस येवो,
लक्ष्मीचा सदैव वास राहो
संकटांचा नाश होवो,
आणि शांतीचा वास राहो
अक्षय्य तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा..!
आजकाल ग्रिटिंग्स,फोटोज, इमेजच्या प्रमाणेच व्हॉट्सअॅप स्टिकर्सच्या माध्यमातूनही अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या जातात.गूगल प्ले स्टोअरवरून हे अक्षय्य तृतीया विशेष स्टिकर्स डाऊनलोड करून तुम्ही व्हॉट्सअॅपवर स्टिकर्सच्या माध्यमातूनही अक्षय्य तृतीयेच्या शुभेच्छा देऊ शकता.
अक्षय या शब्दाचा अर्थच मूळात कधीही क्षय न होणारा असा होतो. त्यामुळे या दिवशी दिलं जाणारं दान देखील कधीही न संपणारं असं समजलं जातं आणि दान दिलं जातं.