Photo Credit: File Photo

हिंदू धर्मात अक्षय तृतीया हा दिवस खुप शुभ दिवस मानला जातो. या दिवसाला खुप जास्त महत्व दिले जाते. दरवर्षी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथी ला अक्षय तृतीया चा पावन साजरा केला जातो. यंदाच्या वर्षी 14 मे, 2021 रोजी अक्षय तृतीया साजरी केली जाणारा आहे. हा पवित्र दिवशी स्नान- दानि, धर्म करण्याचा दिवस असतो. आजच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि विष्णु भगवानांची पूजा देखील केली जाते. या दिवशी काही खास गोष्टी केल्याने माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा राहते. जाणून घेऊयात काय आहे त्या महत्वाचा गोष्टी. (Akshay Tritiya 2021: अक्षय तृतीयेच्या दिवशी 'या' शुभ मुहूर्तावर खरेदी करा सोनं; जाणून घ्या सविस्तर )

घरात स्वच्छता ठेवा

अक्षय तृतीया च्या पवित्र दिवशी दिवस घरात साफ-सफाईवर विशेष लक्ष ठेवणे. या दिवशी घराची चांगली सफाई करा. .आपल्या घरात गंगा जल असेल तर ते संपूर्ण घरात शिंपडा. धार्मिक विचाराच्या अनुसार माता लक्ष्मीच्या वास त्याच घरात होतो जिथे स्वच्छता असेल.

भांडणापासून दूर रहा

हा पावन दिवस घरात कुठल्याही प्रकारचा क्लेश किंवा भांडण करू नका . ज्याच्या घरात क्लेश , भांडण होतात त्या घरात लक्ष्मी का वास करत नाही. त्या घरातले वातावरण चांगले आहे, ज्या कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम असते. तिथे कधी पैशाची कमतरता होत नाही.

सात्विक जेवण करा

अक्षय तृतीयाचा पवित्र दिवशी सात्विक आहार करा. भोजन करण्यापूर्वी प्रथम देवाला नैवैद्य दाखवा. या दिवशी मांस- मदिरा चे सेवन करू नका. आजचा दिवस देवाचे जास्तीत जास्त ध्यान करा.

चुकीच्या कार्यापासून दूर रहा

प्रत्येक व्यक्तिने चुकीच्या कामांपासून दूर रहावे . धार्मिक विवेचना नुसार, अक्षय तृतीयाच्या दिवशी चुकीचे काम तुमच्या आयुष्यात समस्या येऊ शकतात. आजच्या दिवशी गरजू लोकांची मदत करा. तुमच्या क्षमतेनुसार दान करा.

( टीप - वरील लेख माहितीच्या आधारावर लिहिण्यात आलेला आहे.)