Akshaya Tritiya Recipes (Photo Credits: Youtube)

Akshaya Tritiya Recipes: हिंदू धर्मात वैखाश महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या तृतीयेला अक्षय्य तृतीया असे म्हणतात. साडेतीन मुहूर्तापैकी एक समजल्या जाणा-या या सणाला कोणतेही शुभकार्याला करणे चांगले मानले जाते. हिंदू धर्माप्रमाणे या दिवसाला विशेष महत्व आहे. अशा या मंगलमयी दिवसाची सुरुवात छान व्हावी वा हा दिवस छान चैतन्यपूर्ण वातावरणात जावा यासाठी या दिवशी घरी गोडाधोडाचे पक्वाने बनविण्याचे बेत आखले जातात. मात्र यंदा लॉकडाऊन असल्यामुळे काय बनवायचे असा प्रश्न अनेक गृहिणींना पडला असेल. मात्र अशा वेळी गृहिणींनी चिंता व्यक्त न करता घरात आहे त्या साहित्यामध्येही छान गोडाधोडाचा बेत करु शकता.

आंब्याचा सिझन सुरु झाल्यामुळे काही जणांकडे आंबे आले असतील. अशांनी आंब्यापासून काही गोड पदार्थ बनवावेत. ज्यांच्याकडे आंबे नसतील तर घरातील गव्हाचे पीठ, बेसनाचे पीठ यांपासून देखील गोड पदार्थ बनवू शकता. Happy Akshaya Tritiya 2020 Wishes: अक्षय्य तृतीया च्या खास मराठमोळ्या शुभेच्छा, Messages,Greetings, Images, Whatsapp Status च्या माध्यमातून देऊन करा दिवसाची मंगलमयी सुरुवात

गव्हाची खीर

रवा सांजोरी

आंब्याची फिरनी

हेदेखील वाचा- Akshaya Tritiya 2020 Shubh Muhurat: अक्षय्य तृतीया दिवशी घरात सुख, शांती, समृद्धीच्या प्रार्थनेचे पूजाविधी आणि शुभ मुहूर्त काय?

बेसनचा हलवा

आंब्याची बासुंदी

अक्षय्य तृतीया गोड पदार्थांसोबत तुमची वाणी गोड असावी. या दिवशी कुणाशी भांडणं करु नका. दारात कोणी आल्यास त्याला काही तरी दान करा आणि या पदार्थांसह तुमच्या नात्यातील गोडवा वाढवा.