Akshaya Tritiya 2019: हिंदू धर्मात साडेतीन मुहूर्तापैकी एक असा शुभ दिवस म्हणजे अक्षय्य तृतीया. या दिवशी लोक प्रामुख्याने सोने खरेदी करताना दिसून येतात. तर थोड्या प्रमाणात का होईना परंतु लोक सोने नक्की खरेदी करतात. येत्या 7 मे रोजी अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येणार आहे. या दिवशी सर्व शुभ कार्ये केली जातात.
तसेच नव्या व्यापाराची सुरुवात, लग्न आणि सर्व मंगल कार्ये या दिवशी पार पाडली जातात. तर यंदा 15 वर्षानंतर अयक्ष तृतीयाच्या दिवशी सूर्य, शुक्र, चंद्र आणि राहू आपल्या उच्च राशीमध्ये प्रवेश करणार आहेत. तसेच सोन्याचे भावसुद्धा थोडे वाढलेले असतात. परंतु तुम्ही सोन्याऐवजी या गोष्टी सुद्धा या शुभ मुहूर्तावर खरेदी करु शकता. त्यामुळे आयुष्यात धनसंपत्ती आणि सुख-शांती लाभेल.
- अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या पित्र-पूर्वजनांना आनंदित ठेवण्यासाठी पाण्याचा कलश, पंखा, काकडी, खरबूज, साखर आणि तूप या वस्तूंचे दान करा.
-लक्ष्मी देवी प्रसन्न होण्यासाठी या दिवशी 11 कवड्या खरेदी करुन त्या लाल रंगाच्या कपड्यात लपेटून देव्हाऱ्यात ठेवा. त्यामुळे घरात धनसंपत्ती लाभेल.
-सोने खरेदी करणे तुम्हाला जमत नसल्यास तुम्ही लक्ष्मीच्या पादुका खरेदी करुन त्याची दररोज पूजा करा. यामुळे तुम्हाला सुख-शांती लाभेल.
या दिवशी सोने खरेदी करणे फार शुभ मानले जाते. परंतु कोणतही माहगडी वस्तू खरेदी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी खरेदी केल्यास ती अक्षय्य राहते असे मानले जाते.