महाराष्ट्राला कर्तृत्त्ववान स्त्रियांचा वारसा लाभला आहे. त्यापैकीच एक नाव म्हणजे अहिल्याबाई होळकर (Ahilyabai Holkar). 13 ऑगस्ट हा अहिल्याबाईंचा पुण्यतिथीचा दिवस. वयाच्या 70 व्या वर्षी अहिल्याबाईंनी जगाचा निरोप घेतला. आज अहिल्याबाई होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्त खास HD Images, Photos सोशल मीडीयामध्ये शेअर करून त्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी WhatsApp Status, Facebook Messages द्वारा टीम लेटेस्टली कडून तयार करण्यात आलेले हे खास फोटोज तुम्ही डाऊनलोड करून शेअर करू शकता. अहिल्याबाईंचा जन्म महाराष्ट्रातील जामखेड मध्ये झाला होता. नंतर त्यांचं वास्तव्य आता मध्य प्रदेशात असलेल्या इंदौर मध्ये होते. वयाच्या 8व्या वर्षी होळकरांची सून ते 'तत्त्वज्ञानी राणी' पहा अहिल्याबाईंचा हा प्रेरणादायी प्रवास कसा होता?
अहिल्याबाई होळकर या माळव्याच्या जहागीरदार होत्या. होळकर घराण्याच्या 'तत्त्वज्ञानी राणी' म्हणून त्या प्रसिद्ध होत्या. अहिल्याबाईंचे पती खंडेराव होळकर यांचे कुम्हेरच्या लढाईत निधन झाले. पण त्यांचे सासरे मल्हारराव होळकर यांनी त्यांना सती जाऊ न देता सैन्य, राज्यकारभार यांचं शिक्षण दिलं. मल्हारराव होळकर यांच्या मृत्यूनंतर माळवा प्रांताचा कारभार त्या स्वत: सांभाळू लागल्या. अशा या कर्तृत्त्ववान स्त्रीला आजच्या दिवशी मानाचा मुजरा द्यायला विसरू नका.
अहिल्याबाई होळकर पुण्यतिथी
भारतभरामध्ये अनेक हिंदू मंदिरे व नदीघाट त्यांनी बांधले, अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. मध्य प्रदेशातील महेश्वर व इंदूर या गावांना सुंदर बनवले. त्या अनेक देवळांच्या आश्रयदात्या बनल्या. अनेक तीर्थक्षेत्री धर्मशाळा बांधून त्यांनी भाविकांची गैरसोय टाळली. मंदिरांसाठी इतकं काम करूनही त्यांनी धर्माच्या नावाखाली असलेल्या अनेक रूढ, अनिष्ट प्रथांना छेद दिला. सतीला विरोध करत त्यांनी अंधश्रद्धा निर्मुलनाचे देखील काम केले. इतिहासात एका इंग्रजी लेखकाने अहिल्यादेवी होळकर, यांची तुलना भारताच्या "कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ, मार्गारेट" अशी केली आहे. तर इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कथेरीन, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी केल्याचे दाखले आढळतात.