Republic Day Parade | (Photo Credit - Twitter/ANI)

भारत यंदा आपला 75 वा प्रजासत्ताक दिन (73rd Republic Da) साजरा करत आहे. राजधानी दिल्ली येथे प्रत्येक प्रजासत्ताक दिनी परेड (Republic Day Parade) आयोजित केली जाते. ही परेड (Republic Day Parade) नियमीत वेळेनुसार सुरु होते. यंदा मात्र इतक्या 75 वर्षांच्या इतिहासात प्रथमच ही परेड 30 मिनीटे उशारीने सुरु होणार आहे. कोरोना प्रोटोकॉल (COVID-19-Related Restrictions) आणि श्रद्धांजली सभेमुळे ही परेड सुरु होण्यास विलंब लागणार असल्याचे सांगितले जात आहे. परेडच्या सुरुवातीला जम्मू-कश्मीरमध्ये आपले प्राण गमाविणाऱ्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाईल. त्यानंतर परेड सुरु होईल.

प्रजासत्ताक दिनाची परेड साधारण 90 मिनिटे सुरु होते. प्रत्येक वर्षी 26 जानेवारी रोजी सकाळी 10 वाजता राजपथ येथून ही परेड सुरु होते. मात्र, यंदाच्या वर्षी ही परेड सकाळी 10.30 वाजता सुरु होईल. ही परेड 8 किलोमीटर होईल. रायससीना हिल येथून सुरु होऊन ही परेड राजपथ, इंडिया गेट येथून लाल किल्ला येथे संपते. परेड सुरु होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी, इंडिया गेटवर अमर ज्योती आणि राष्ट्रीय स्मारक येथे पूष्पहार अर्पण करतात आणि शहीदांना श्रद्धांजली वाहतात. (हेही वाचा, MSRTC Strike: एसटी कर्मचाऱ्यांबाबत मोठ्या घोषणेची शक्यता, परिवहन मंत्री अनिल परब यांची सायंकाळी पत्रकार परिषद)

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी नेहमीप्रमाणेच सुरक्षा व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे. सुमारे 300 सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले असून चेहऱ्यांची ओळख पटवणारी यंत्रणाही कार्यन्वीत करण्यात आली आहे. या सिस्टममध्ये 50 हजार संशयीत आरोपींचा डेटाबेस आहे. कोविड-19 शी संबंधित नियमांचे पालन केले जात असल्याने यंदा केवळ 4 हजार तिकीटेच परेडसाठी उपलब्ध असतील. सुमारे 24 हजार लोकांना या कार्यक्रमात सहभागी होण्याची परवानगी दिली जाईल.

ट्विट

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने राजपथावर परेडमध्ये सुमारे 75 विमानांचा ताफा सर्वात मोठे आकर्षण असणार आहे. हा ताफा एक भव्य प्रात्यक्षीके करेल. हवाई दलाचे जनसंपक्र अधिकारी विंग कमांडर इंद्रनील नंदी यांनी म्हटले की, यंदाच्या वर्षी फ्लाईपास्ट भव्य आणि तितकाच अद्भूत असेन. भारतीय वायुसेना, थलसेना आणि नौसेना या तिन्ही दलांची मिळून 75 विमाने प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये हवेत झेपावतील. आझादीचा अमृत महोत्सव यंदा काहीसा अनुरुप असेल.