भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ते दलितांचे उद्धारदाते डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. BR Ambedkar) यांचा आज (6 डिसेंबर) 65 वा महापरिनिर्वाण दिन (Mahaparinirvan Din) आहे. 6 डिसेंबर 1956 दिवशी बाबासाहेबांनी दिल्ली मध्ये अखेरचा श्वास घेतला होता. त्यानंतर बौद्ध धर्मातील सर्वात महत्त्वाचं तत्त्व आणि ध्येय म्हणजे परिनिर्वाण. परिनिर्वाण या शब्दाची फोड केल्यास त्यामागील अर्थ समजण्यास मदत होते. परिनिर्वाण या शब्दाचा अर्थ मृत्यू नंतर निर्वाण म्हणजेच मुक्ती असा होतो. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधत देशभरातील आंबेडकरी जनता, बौद्ध धर्मीय तसेच भीम अनुयायी दादर शिवाजी पार्क येथील चैत्यभूमीवर येऊन त्यांच्या स्मृतीला अभिवादन करतात. मग यंदा तुम्ही देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी लेटेस्टली टीम कडून तयार करण्यात आलेली ही मराठमोळी HD Images, Messages, WhatsApp Status द्वारा शेअर करू शकता.
दरम्यान यंदा ओमिक्रॉनची दहशत आणि कोरोना संकट पाहता भीम अनुयायींना एकमेकांची भेट मोठ्या प्रमाणात चैत्यभूमीवर घेता येणार नाही. म्हणूनच सोशल मीडीयाच्या माध्यमातूनच तुम्हांला डॉ. बाबासाहेबांना अभिवादन अर्पण करावं लागणार आहे त्यासाठी हे फोटोज तुम्ही नक्की शेअर करू शकता. 65th Mahaparinirvan Din at Chaityabhoomi Live Streaming: कोरोना संकट पाहता महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी चं लाईव्ह दर्शन घेण्यासाठी BMC कडून YouTube, Twitter, Facebook वर थेट प्रक्षेपणाची सोय.
.
महापरिनिर्वाण दिन मेसेजेस
निर्वाण प्राप्त करणं हे अत्यंत कठीण आहे. जी व्यक्ती सत्त्विक, शुद्ध आयुष्य जगतात त्यांना ही स्थिती प्राप्त करता येते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 रोजी झाले. दिल्ली येथील डॉ. आंबेडकरांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बौद्ध धर्माचा अभ्यास केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला. नागपूरात 14 ऑक्टोबर 1956 साली सुमारे 5 लाख अनुयायांनी त्यांना बौद्ध नेते म्हणून स्वीकारले. 7 डिसेंबर 1956 दिवशी त्यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क दादर या परिसरामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले होते.