जगभरात 4 फेब्रुवारी हा दिवस World Cancer Day म्हणून पाळला जातो. बदलत्या जीवनशैलीतून कॅन्सरचा विळखा आता आबालवृद्धांमध्ये जडताना दिसत आहे. दरम्यान दुर्धर आजारांपैकी एक म्हणून कॅन्सर कडे पाहण्याच्या दृष्टीमुळे या आजाराबाबत अनेकांच्या मनात भीती आहे. समज- गैरसमजांचे जाळं आहे. त्यामुळेच आजच्या दिवशी कॅन्सर सारख्या आजाराबाबत समाजात जनजागृती निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातात. कॅन्सर डे चं औचित्य साधत अनेकजण या आजारावर मात करून पुन्हा आयुष्य नव्याने जिंकण्याची आशा बाळगणार्यांच्या उत्साहाला बळकटी देण्याचादेखील आहे. World Cancer Day 2021: कर्करोग बरा होतो का? 'जागतिक कर्करोग दिना'निमित्त जाणून घ्या भारतात होणाऱ्या 5 सामान्य कर्करोगाच्या प्रकाराविषयी.
कॅन्सरचं वेळीच निदान झालं तर या आजारावरही मात करता येऊ शकते. यामध्ये आज औषधोपचार आणि निदान पद्धतीमध्येही मोठे बदल झाल्याने अनेकांचं जीवन पुन्हा पूर्ववत करण्यासाठी मदत होत आहे. पण त्यासाठी रूग्णाच्या मानसिक तयारीची आणि सकारात्मक उर्जेची देखील त्याला जोड असणं आवश्यक आहे. मग आज कॅन्सर डे च्या निमित्ताने या दुर्धर आजारावर मात केलेल्या अशाच काही व्यक्तींचे Quotes HD Images च्या माध्यमातून शेअर करून या आजाराशी लढणार्यांना बळ द्या.
जागतिक कर्करोग दिन 2021
- “We Have Two Options, Medically and Emotionally: Give Up or Fight Like Hell.” Lance Armstrong
“More Than 10 Million Americans Are Living With Cancer, and They Demonstrate the Ever-Increasing Possibility of Living Beyond Cancer.” Sheryl Crow
"You Can Achieve Anything You Set Your Mind to.” – Jimmy
“Pancreatic Cancer Is Another Speed Bump Thrown Our in the Road of Life. We May Slow Down but We Do Not Stop Living Our Daily Lives.” – Michael
कॅन्सर सारख्या आजारामध्ये सुरूवातीच्या स्तरावरच जर आपणं लक्षणांवरून सजग झालो तर जीव वाचवणं अनेकदा शक्य होतं. तसेच कॅन्सर सारखा आजार हा शरीरात झपाट्याने फोफावत असल्याने तो वाढल्यानंतरच अनेकदा त्याचं निदान होतं. त्यामुळे शरीरात अगदी लहान-मोठ्या बदलांनाही वेळीच ओळखण्यासाठी विशिष्ट महिन्यांनी पूर्ण शारिरीक तपासणी करून घेण्याची सवय ठेवा म्हणजे तुम्हांला वाढत्या वयासोबत येणार्या आजारपणांना वेळीच रोखता येऊ शकतं.