प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

लहान वयात केस सफेद होण्याची समस्या काही महिला आणि पुरुषांना जाणवू लागते. त्यामुळे अवघ्या लहान वयातच केस सफेद झाल्याच्या प्रकारामुळे आपण म्हाताऱ्यासारखे दिसतोय याची खंत वाटू लागते. त्यासाठी केसांवर विविध प्रकराचे उपाय केले जातात. तर बाजारातसुद्धा केस काळे करण्यासाठी केमिकलयुक्त रंग येतात. परंतु ते केसांसाठी फायदेशीर नसते.

त्याचसोबत काही आयुर्वेदिक दुकानांमध्ये नैसर्गिकरित्या सफेद केसांवर उपाय करण्यासाठी पावडर किंवा रंग येतो. मात्र या गोष्टींपासूनसुद्धा तुम्हाला केसांची काळजी अधिक वाटत असल्यास घरगुती पद्धतीने उपाय करणे उत्तम ठरेल. तर 'या' घरगुती उपयांनी सफेद केसांच्या समस्येपासून दुर राहता येईल.

-कांदा

कांद्याच्या रस आणि तेल यांचे मिश्रण करुन ते केसांना लावल्यास त्यांची वाढ उत्तम होते. तसेच केस गळतीसुद्धा थांबते. त्याचसोबत सफेद होणाऱ्या केसांची समस्या हळूहळू कमी होण्यास मदत होते.

-आवळा

असे मानले जाते की, आवळ्यामुळे केस अधिक मजबूत होतात. त्याचसोबत केस काळ्या रंगाची राहण्याससुद्धा फार मदत होते. त्यामुळे नैसर्गिर पद्धतींचे शॅम्पू किंवा तेलासाठी आवळ्याचा वापर केला जातो.

- काळी चहा

एक कप पाण्यात काळ्या चाहाची पाने उकळवून त्याचे पाणी केसांना लावावे. यामुळे केसांना काळा रंग येण्यासोबत केसांची खुंटलेली वाढ होण्यास सुरुवात होते. तसेच काळ्या चहामध्ये अँन्टीऑक्सिडेंट गुण भरपूर प्रमाणात आढळून येतात.

-कढीपत्ता

तेलात कुटलेल्या कढीपत्त्याची पाने टाकून ते केसाला लावाले. कढीपत्ता मध्ये असलेल्या मेलॅनिन पिग्मेंट हेअर फॉलिकल होण्यापासून थांबवते. तसेच सफेद केस होण्याची समस्या दूर होते.

(वयाच्या 40 व्या वर्षानंतर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी करा 'हे' उपाय)

तर वरील घरगुती उपायांनी केस सफेद होण्याची समस्या तुम्ही दूर करु शकता. तसेच केसांना केमिकलयुक्त रंग लावण्यापासून स्वत:ला दूर ठेवावे. त्याचसोबत केसांच्या वाढीसाठी तेल हा उत्तम पर्याय असल्याने आठवड्यातून दोन-तीन वेळा केसांना मसाज केल्याने त्यांची वाढ उत्तम होते.