How To Choose Perfect Bra: तुम्हाला कम्फर्टेबल व फॅशनेबल ठेवणारी ब्रा निवडताना नक्की फॉलो करा 'हे' गोल्डन रूल
How To Choose Perfect Bra (Photo Credits: Instagram/Femina)

मुलगी वयात आली कि तिच्या शरीरात अनेक बदल होत असतात, मुख्यतः दिसून येणारा बदल म्हणजे स्तनांचे आकार (Breast Size). या बदलामुळे एका अर्थाने स्त्रीचे सौंदर्य अधिक खुलून येते. म्ह्णूनच स्तनांचा आकार सुडौल ठेवण्यासाठी प्रत्येक मुलगी प्रयत्न करत असते. सौंदर्यासोबतच शरीराच्या स्वास्थ्यासाठी देखील स्तनांची काळजी घेणे गरजेचे असते. यासाठी सुरुवातीपासूनच म्हणजेच साधारण Teenage पासूनच ब्रा (Bra) वापरणे आवश्यक असते. आज आपण असे काही गोल्डन रुल्स बघणार आहोत जे फॉलो करून तुम्हाला तुमची 'द परफेक्ट' ब्रा निवडताना मदत होईल..

पहिल्यांदा ब्रा घातल्यानंतर थोडे अवघडल्यासारखे वाटू शकते पण नंतर तुम्हाला ब्रा ची सवय होते. अलीकडे बाजारात अनेक फॅशनेबल ब्रा चे पॅटर्न आले आहेत. अनेकदा यातुन निवड करणे म्हणजे मोठे टास्क बनून बसते पण तुमच्या साईजनुसार आणि कम्फर्टनुसार ही निवड करणे खूप महत्वाचे असते, अन्यथा याचे खूप गंभीर परिणाम देखील जाणवू शकतात.  अंतर्वस्त्रे निवडताना घ्या अशी काळजी, नाहीतर 'प्रायव्हेट पार्टस'वर होईल हा परिणाम

चला तर मग जाणून घेऊयात कशी निवडावी ब्रा..

  • सर्वात महत्वाचे म्हणजे साधारणतः ब्रा चा आकार हा 28 इंचापासून सुरु होतो. आपल्या शरीराच्या अर्थात स्तनांच्या आकाराच्या मापाप्रमाणेच ब्रा घालावीत ब्रा अगदी घट्ट अथवा अगदी सैल असू नये.
  • ब्रा ऑनलाईन खरेदी करायची असल्यास आधीच आपला ब्रँड, साइज आणि प्रकार माहिती करून घ्या, कोणताही संभ्रम असल्यास सुरुवातीला दुकानातून किंवा मॉल मधून योग्य मदत घेऊन मगच ब्रा खरेदी करा.
  • स्तनांच्या खालच्या भागाचा आकार म्हणजेच ब्रा च्या बँडचा साईझ तसेच कपचा शेप व साईझ माहिती असणे गरजेचे आहे. सध्या बाजारात AA (1/2 इंच) पासून सुरु होऊन ते D म्हणजेच 4  इंच पर्यंत कप साईझ उपलब्ध आहेत.
  • ज्या ब्रा तून आपले स्तन बाहेर निघत असतील अशी ब्रा खरेदी करणे टाळा. याऐवजी फुल कव्हरेज ब्रा चा पर्याय तुमच्या छातीला अगदी सर्व बाजूने कव्हर करणारा आणि उत्तम ठरतो.
  • ब्रा ची स्ट्रीप जर का लूज असेल तर सतत खांद्यावरून सरकत राहते, यामुळे तुम्हाला वावरताना त्रास होऊ शकतो. म्ह्णूनच या स्ट्रिप्स नीट घट्ट करून घ्या.
  • ब्रा विकत घेण्याआधी नेहमी ट्राय करून पहा. अंगावर ब्रा घालताच पुढील व डाव्या- उजव्या दोन्ही बाजूस वाकून पहा, जर का यावेळी तुमचे स्तन किंचितही बाहेर येत असतील तर ही ब्रा तुमच्यासाठी योग्य नाही.

ब्रा विकत घेतल्यावर वापरताना सुद्धा खास काळजी घेणे गरजेचे असते. त्यामुळे एकच ब्रा सतत वापरू नका. दिवसाच्या अखेरीस झोपताना ब्रा घालून झोपू नका. अलीकडे प्रत्येक गरजेनुसार बाजारात वेगवेगळ्या ब्रा उपलब्ध आहेत त्यामुळे सुरुवातीला तुमची गरज ओळखा. मैत्रिणींनो, ब्रा ही नेहमीच आपल्या शरीराला बिलगून राहणारी वस्तू आहे त्यामुळे तिची निवड एकदम परफेक्ट असणे खूप गरजेचे आहे. पटतंय ना?