प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य फेसबुक)

समुद्रशास्त्रानुसार आपल्या शरीरावरील असणाऱ्या खुणा आणि तीळ यांचा आयुष्यावर खूप प्रभाव पडत असतो. काही लोक त्यांच्या नखांवर आलेल्या अर्ध चंद्रकोर (Half Moon) ला शुभ मानतात. मात्र हे शुभचे संकेत नक्की खरे आहेत का? जाणून घ्या.

1. आयुष्यात भरभराट होते

जर तुमच्या तर्जनी बोटावर म्हणजेच अंगठ्याच्या बाजूवरील बोटाच्या नखावर अर्धा चंद्र असेल तर तो शुभ संकेत देतो. तसेच आयुष्यात भरभराट होण्यास मदत ही होते.

2. 'हा' त्रास होतो

जर तुमची नखं मोठी असतील आणि त्यावर चंद्र असेल तर ते अशुभ समजले जाते. वाढलेल्या नखांवरील चंद्रकोरचे चिन्ह म्हणजे डोके दुखणे, गळा आणि शरीरदुखी होण्याची समस्या उद्भवू शकते.

3. नखांवरील अर्धा चंद्र देतो अशुभ संकेत

जर तुमची नखं छोटी आणि त्यावर चंद्र असेल तरीही ते अशुभ मानले जाते. कारण त्यामुळे पाठीचा कणा आणि पायाचा वेदना होऊ शकतात. तसेच अंगठ्यावरसुद्धा ही खुण असेल तर तुम्हाला नवीन मित्र लाभण्याची शक्यता असते.

4. वैऱ्याची भावना निर्माण होते

बोटांमधील सर्वात मोठे बोट म्हणजेच मध्यमा त्यावर चंद्राची खुण असेल तर त्याचा अर्थ तुमच्याशी कोणीतरी चोरून वैऱ्याची भावना ठेवणार आहे. त्यावेळी तुम्ही विचारपूर्वक बोलणे योग्य ठरेल.

5. व्यवहारामध्ये होतो लाभ

जर अनामिक बोट म्हणजेच अंगठी घालण्याच्या बोटावर चंद्राचे निशाण असेल तर ते शुभ मानले जाते.तर करंगळीवरील या निशाणामुळे व्यवहारात लाभ होण्याची शक्यता वर्तविली जाते.