गळ्यावर आलेले काळे डाग 'या' घरगुती उपायांनी करा दूर
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महिला आपला सौंदर्य अधिक खुलून दिसण्यासाठी विविध उपाय करतात. खासकरुन महिला आपल्या चेहऱ्याची फार काळजी घेताना दिसतात. मात्र चेहऱ्याची काळजी घेण्याच्या नादात मानेवरील डाग आणि चट्टे यांसाठी काय उपाय करायचे हे विसरुन जातात. त्यामुळे फक्त चेहरा सुंदर असल्याने काही होत नाही. मानेवरील डागांमुळेसुद्धा तुमचे सौंदर्य कोमेजल्यासारखे दिसून येते.

जशी तुम्ही चेहऱ्याची काळजी घेता त्याचप्रमाणे मानेची सुद्धा काळजी घ्यायला हवी. कारण बहुतांश वेळेस मानेवर आलेले डाग जाण्यासाठी खुप कालावधी लागत असल्याने त्याच्याकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे 'या' घरगुती उपायांनी गळ्यावर आलेले काळे डाग तुम्ही दूर करु शकता.

-बटाट्याचा किस आणि लिंबू

गळ्यावरील काळे डाग तुम्हाला घरगुती पद्धतीने घालवायचे असल्यास त्यासाठी बटाट्याचा किस आणि लिंबू यांचे मिश्रण तयार करावे. हे मिश्रण गळ्यावर जेथे काळे डाग आहेत तेथे 15 मिनिटे लावून ठेवावे. तसेच हे मिश्रण धुतल्यावर मधाने काही मिनिटे त्या जागेवर मसाज करावे. असे केल्याने गळ्यावरील काळे डाग दूर होण्यास मदत होते.

-बेसन आणि तांदळाचे पीठ

बेसन आणि तांदळाच्या पीठाचे मास्क बनवून ते काळ्या डागांच्या येथे लावून ठेवावे. तर कमीतकमी 10 मिनिट हा मास्क लावून ठेवल्याने हळूहळू काळे डाग पुसट होण्यास मदत होते. मात्र मास्क धुताना साबणाचा वापर करु नका.

(हेही वाचा-पावसाळ्यात पायांना भेगा पडल्यास करा 'हे' सोपे उपाय)

या वरील घरगुती उपायांनी तुम्ही गळ्यावरील काळे डाग दूर करु शकता. तसेच चेहऱ्याच्या सौंदर्यासोबत गळ्यावरील दूर झालेल्या डागांमुळे तुम्ही अधिक सुंदर दिसण्यास मदत होईल.