कॉस्मेटिक खरेदी करण्यापूर्वी लक्षात ठेवा 'या' गोष्टी
Beauty Products (Photo Credits-Facebook)

तरुण असो किंवा तरुणी सध्याच्या जीवन पद्धतीत सुंदर दिसणे हा एक महत्वाचा भाग बनला आहे. तर सुंदर दिसण्यासाठी बाजारात विविध कंपन्यांचे ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध असून ते तुमचे सौंदर्य अधिक खुलवतात. मात्र काही ब्युटी प्रोडक्ट्स सर्व प्रकारच्या स्किन टोनला सूट होतील असे नाही. त्यासाठी कंपन्या प्रत्येक स्किन टोन प्रमाणे ब्युटी प्रोडक्ट्स तयार करतात. कॉस्मेटिक वापरुन तुमचा लूक बदलून जातो. तसेच स्वत:ला नव्या रुपात पाहताना प्रत्येकाला आनंद होतो.परंतु बाजारात जरी विविध कॉस्मेटिक प्रोडक्ट्स उपलब्ध असले तरीही ते खरेदी करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कारण कॉस्मेटिक हे एका व्यक्तीला सूट होते तेच दुसऱ्या व्यक्तीला सूट होईल असे नसते. तर जाणून घ्या कॉस्मेटिक खरेदी करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा.

-कॉस्मेटिक मधील इनग्रेडिएंट्स कोणते आहेत ते प्रथम जाणून घ्या. कारण कॉस्मेटिक मध्ये काही रासायनिक पदार्थ असतात ते तुमच्या त्वचेसाठी धोकादायक ठरु शकतात. त्यामुळे ब्युटी प्रोडक्ट्स खरेदी करताना ते आपल्या त्वचेसाठी सूट होऊ शकते का याचा सुद्धा विचार करा.

-जर तुम्ही ब्युटी प्रोडक्ट्स ऑनलाईन पद्धतीने विकत घेत असल्यात त्याबाबत रिव्हू नक्की वाचा. कारण प्रोडक्ट्सबद्दलचा रिव्हू वाचून तुम्ही ते खरेदी करण्यायोग्य आहे की नाही हे कळेल. त्याचसोबत काही वेळेस ऑनलाईन पद्धतीने प्रोडक्ट्स खरेदी करताना त्याबाबत दाखवले जाते एक आणि डिलिव्हरी झाल्यानंतर भलतेच प्रोडक्ट हाताता मिळते.

-तुम्ही कॉस्मेटिक खरेदी करण्यापूर्वी तुमची त्वचा कोरडी, ऑयली की नॉर्मल स्वरुपाची आहे ते आधी जाणून घ्या. त्यामुळे जर तुम्ही एखाद्या कंपनीचे फाउंडेशन खरेदी करत असल्यास ते तुमच्या त्वचेला सूट होऊ शकते का ते पहा.(थंडीत कशा पद्धतीचा मेकअप कराल; मेकअप आर्टिस्ट विनायक वरदे यांच्याकडून माहित करून घ्या काही खास टिप्स)

तसेच ब्युटी प्रोडक्ट खरेदी करताना तुमच्या त्वचेचा रंग, स्किन टोन काय आहे हे सुद्धा जाणून घ्या. बाजारात सध्या फाउंडेशन ते लिप कलर्स पर्यंत संबंधित विविध प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. तसेच प्रोडक्ट्सवरील पॅकिंग आणि एक्सपायरि डेट काय आहे हे आर्वजून पहा.