न्यू जर्सी (New Jersey) येथे पार पडलेल्या Miss India USA स्पर्धेत व्हर्जिनियाच्या (Virginia) भारतीय-अमेरिकन आर्या वाळवेकर (Aarya Walvekar) हिने मिस इंडिया यूएसए 2022 चा किताब पटकावला आहे. विजेती आर्या वाळवेकर हिला भविष्यात अभिनेत्री (Actress) व्हायचं आहे, टेलिव्हिजनसह (Television) मोठ्या पडद्यावर झळकण्याचं तिचं स्वप्न असल्याचं आर्यानं व्यक्त केलं आहे. तसेच आर्याला नवनवीन जागी प्रवास करणे, नवीन लोकांना भेटने, विविध विषयांवर चर्चा करणे, स्वपंपाक (Cooking) करणे या तिच्या आवडीच्या गोष्टी आहे असं देखील आर्याने सांगितलं. आर्या सध्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत ्असुन पुढे तिला तिचं करियर, अॅक्टींग,फॅशन, लाईफस्टाइल या क्षेत्रात करायचं असल्याचं आर्याने स्पष्ट केलं आहे तसेच मिळालेल्या या किताबाबाबत तिने आनंद व्यक्त केला आहे.
याचं स्पर्धेत व्हर्जिनिया विद्यापीठातील ((Virginia University) द्वितीय वर्षाची प्रीमेडिकल विद्यार्थिनी (Pre Medical student) सौम्या शर्मा (Soumya Sharma) ही प्रथम उपविजेती (First Runner UP) तर न्यू जर्सीची संजना चेकुरी (Sanjana Chekuri) द्वितीय उपविजेती (Second Runner UP) ठरली. Miss India USA या स्पर्धेची सुरुवात न्यूयॉर्क (New York) मधील भारतीय-अमेरिकन धर्मात्मा आणि नीलम सरन यांनी वर्ल्डवाईड पेजंट्सच्या बॅनरखाली केली होती. तर गेल्या वर्षी म्हणजे Miss India USA 2021 चा किताब वैदेही डोंगरेने (Vaidehi Dongare) पटकावला होता. ( हे ही वाचा:- Unique Hairstyles: विचित्र केशरचना, डोक्यावर कोरला घोडा; हेअर स्टाईल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल)
मिस इंडिया यूएसए, मिसेस इंडिया यूएसए आणि मिस टीन इंडिया यूएसए या तीन वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये 30 राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तब्बल 74 स्पर्धकांनी भाग घेतला. तिन्ही श्रेणीतील विजेत्यांना त्याच गटाद्वारे आयोजित जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यासाठी पुढील वर्षाच्या सुरुवातीला मुंबईला जाण्यासाठी मोफत तिकिटे मिळतील. तसेच या कार्यक्रमाला भारतीय गायिका शिबानी कश्यप, खुशी पटेल, मिस इंडिया वर्ल्डवाइड 2022 आणि स्वाती विमल, मिसेस इंडिया वर्ल्डवाइड यांनी प्रमुख अतिथी म्हणून हजेरी लावली होती.