आपण अनेकदा स्वतःला एखादया व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवताना पाहतो, कुटुंबातील किंवा समान लिंगातील कोणत्यातरी व्यक्ती सोबत आपण लैंगिक संबंध ठेवत असल्याचे स्वप्न आपल्याला अनेकदा पडतात.अशा स्वप्नांचा अर्थ काय? आपण अनेकदा स्वप्न शक्य तितक्या लवकर विसरतो. पण, ही स्वप्ने प्रत्यक्षात काय सूचित करतात? त्या स्वप्नांचा अर्थ काय ? असे म्हटले जाते की, सेक्सची स्वप्ने प्रत्यक्षात कधीच सेक्सबद्दल नसतात, परंतु आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल काही तरी सांगत असतात. ते स्वप्नात येणाऱ्या लोकांबद्दल नसून ते तुमच्या आयुष्यात काय प्रतिनिधित्व करतात याबद्दल देखील असू शकते. येथे आम्ही विविध प्रकारच्या लैंगिक स्वप्नांबद्दल सांगणार आहोत.
अनोळखी व्यक्तीसोबत सेक्स:
कार्ल जंगचा एक सिद्धांत आहे की, प्रत्येक व्यक्तीमध्ये अॅनिमस किंवा अॅनिमा असतो. अॅनिमस म्हणजे प्रत्येक स्त्रीमध्ये असलेली पुरुष उर्जा आणि अॅनिमा म्हणजे प्रत्येक पुरुषाकडे असलेली स्त्री उर्जा होय. जेव्हा तुम्ही कल्पना करता की तुम्ही ज्या व्यक्तीला ओळखत नाही आणि विरुद्ध लिंगाचा आहे अशा व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवत आहात, तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीची स्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. तो तुमच्यातील अॅनिमस किंवा अॅनिमा एनर्जीचा प्रतीक आहे. समजा, तुम्ही एक स्त्री आहात आणि तुम्ही नम्र असलेल्या अनोळखी व्यक्तीसोबत लैंगिक संबंध ठेवत आहात. याचा अर्थ असा आहे की तुमच्या व्यक्तिमत्त्वातील मर्दानी पैलू कमकुवत आहेत आणि तुम्हाला त्यावर काम करणे आवश्यक आहे. तथापि, जर तो एक मजबूत आणि धाडसी माणूस तुम्हाला दिसत असेल तर याचा अर्थ असा आहे की तुमचे व्यक्तिमत्व स्त्री आणि पुरुष शक्तींच्या योग्य संतुलनात आहे असा त्याचा अर्थ होतो.
स्वप्नात सेक्स करतांना चेहरा न दिसणे :
स्वप्नात सेक्स करतांना कोणासोबत लैंगिक संबंध ठेवत आहोत ते न दिसणे. अनोळखी व्यक्तीसोबत सेक्स करणे म्हणजे तुमच्या आयुष्यात तुम्हाला अद्याप माहित नसलेल्या एखाद्या व्यक्तीची वाट पाहणे असे नाही. हे फक्त तुमच्या जीवनातील एक विचित्र पैलू समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे. याचा अर्थ असा होऊ शकतो की तुमचे जीवन आणि विचार अधिक नियंत्रित आणि दृढ.
एक्स प्रियकाराबोबत सेक्स:
जर तुम्ही तुमच्या माजी प्रियकराशी लैंगिक संबंध ठेवण्याचे स्वप्न पाहत असाल तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या मनात अजूनही त्याच्यासाठी भावना आहेत, ज्याचा आपल्यापैकी बहुतेकजण चुकीचा अर्थ लावतात. आपल्या माजी बद्दल स्वप्न पाहण्याचा अर्थ असा आहे की, भूतकाळात जे होतो त्यात आपण रमतो आणि आपण अनेकदा आपल्या वर्तमान नातेसंबंधांची तुलना आपल्या पूर्वीच्या नातेसंबंधांशी करतो. अशी स्वप्ने केवळ या इच्छेचे प्रतीक आहेत. याचा सरळ अर्थ असा आहे की, तुम्हाला तुमच्या सध्याच्या नातेसंबंधाबाबत संतुष्ट नाही.