3 सप्टेंबर 2019 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून घ्या मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.
मेष: मेष राशीमधील व्यक्तींना आज विदेशातून शुभ संकेत मिळतील. तसेच मित्रपरिवारासह आज तुम्हाला दिवस घालवण्याची संधी मिळेल. आरोग्य उत्तम राहिल परंतु पूर्ण काम करण्यासाठी आळशीपणा कराल. घरातील मंडळींची साथ लाभेल.
शुभ उपाय- गुळ घाऊन घरातून निघा.
शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करावे.
शुभ अंक- 5
शुभ रंग- आकाशी निळा
वृषभ: आजच्या दिवशी वृषभ राशीतील व्यक्तींना धनलाभ होणार आहे. परंतु आजारपणावर पैसे खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. व्यापारधंद्यातील मंडळींचे थकीत पैसे परत मिळणार. मात्र कोणत्याही कामातील निर्णय घाईमध्ये घेणे टाळा.
शुभ उपाय- भगवान शंकराची उपासना करा.
शुभ दान- मंदीर उभारणीच्या कामात मदत करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- पिवळा
मिथुन: आजच्या दिवशी कोणतेही नवीन कार्य करु नका. बाहेर प्रवासाला जाण्याचे टाळा. त्याचसोबत वाद-विवाद टाळावे. मानहानिचा योग संभवतो. तर कोणताही निर्णय घाईगडबडीत घेऊ नका.
शुभ उपाय- कोणाचे ही उष्ट अन्न खाऊ नका.
शुभ दान- लाल रंगाच्या कपड्याचे वस्रदान करावे.
शुभ अंक- 2
शुभ रंग- गुलाबी
कर्क: कर्क राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवस हा खास असणार आहे. कारण आजच्या दिवसात तुमच्याकडून एका वेगळ्या आणि विशिष्ट पद्धतीने कामे पूर्ण होणार असून आत्मविश्वास वाढणार आहे. मित्रपरिवारासह बाहेर जाण्याचा योग आहे. आई-वडिलांची साथ लाभेल.
शुभ उपाय- खडीसाखरेचे सेवन करावे.
शुभ दान- गरजूंना तांदूळ दान करा.
शुभ अंक- 8
शुभ रंग- निळा
सिंह: आज तुम्हाला ऑफिसातील किंवा इतर मंडळींच्या सहवासामुळे तुमच्यावरील ताण कमी होऊन त्यांची साथ लाभणार आहे. कोणत्यातरी जुन्या मित्र-मैत्रिणी सोबत गाठभेठ होऊ शकते. आजच्या दिवशी केलेले कार्य पूर्णत्वास जाईल. परंतु तुम्ही जास्त भाऊक राहाल.
शुभ उपाय- अर्धा कप फिके दुध प्या.
शुभ दान- गरजूंना अंथरुण दान करावे.
शुभ अंक- 5
शुभ रंग- जांभळा
कन्या: कन्या राशीतील व्यक्तींनी आज अतिरिक्त खर्च होण्यापासून दूर रहावे. तसेच राहिलेली कामे आजच्या दिवशी पूर्ण केल्यास उत्तम. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस उत्तम नसेल पण आरोग्य उत्तम राहील. जवळीकच्या व्यक्तीसोबत भांडण होण्याची शक्यता आहे.
शुभ उपाय- घरातील वयोवृध्द व्यक्ती असेल तर छानसे एक गिफ्ट द्या.
शुभ दान- रक्तदान करा.
शुभ अंक- 1
शुभ रंग- हिरवा
तुळ: आजच्या दिवशी घरातील मंडळींसोबत जरा जपून वागा. कारण घरात आज भांडण होण्याची शक्यता असून ताणतणाव वाढेल. खर्च वाढतील, आरोग्यात बिघडू शकते. शब्द जपून वापरा आणि कोणाशी ही भांडण करु नका.
शुभ उपाय- हिरव्या भाज्यांचे सूप प्या.
शुभ दान- साखर दान करा.
शुभ अंक- 9
शुभ रंग- नारंगी
वृश्चिक: वृश्चिक राशीतील मंडळींनी आज कायद्यासंदर्भातील गोष्टींपासून दूर रहावे. दुर्घटना होण्याची शक्यता आहे. वाहन सावधगिरीने चालवा. तर कोणताही निर्णय जलदपणे घेऊ नका.
शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळाचे सेवन करा.
शुभ दान- वृद्धाश्रमातील व्यक्तींना वस्रदान करा.
शुभ अंक-3
शुभ रंग- पिवळा
धनु: उद्योगधंद्यातील मंडळींना कामात आजच्या दिवशी लाभ होणार आहे. दुसऱ्या मंडळींकडून तुमच्या कामाचे कौतूक केले जाईल त्याचसोबत इतर लोक तुमचा आदर करतील. थकीत पैसे मिळण्याची शक्यता आहे. शासकीय कामे होतील. विचारपूर्वक निर्णय घ्या. तुम्हाला आजच्या दिवशी शुभ संकेत मिळण्याची शक्यता आहे.
शुभ उपाय- कापूर टाकून देवाची पूजा करा.
शुभ दान- अत्तर दान करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- क्रिम कलर
मकर: मकर राशीतील व्यक्तींसाठी आजच्या दिवसात चांगल्या घडामोडी होण्याची शक्यता आहे. आर्थिक, सामाजिक आणि घरासंबंधीत क्षेत्रात लाभ मिळणार आहे. लग्नकार्य होण्याचे ठरु शकते. बाहेर फिरायला जाऊ शकता. खूप काळापासून राहिलेले काम आज पूर्ण होणार आहे.
शुभ उपाय- शिवलिंगावर पाणी अर्पण करा.
शुभ दान- मंदिरातील ब्राम्हणाला वस्र आणि दक्षिणा द्या.
शुभ अंक- 5
शुभ रंग - करडा
कुंभ: आजच्या दिवसाची तुमची सुरुवात धनलाभापासून होणार आहे. घरात सुख शांती नांदणार आहे. विचारपूर्वक कामे केल्यास होणाऱ्या नुकसानीपासून दूर रहाल. आई-वडिलांची कोणतीही गोष्ट टाळू नका.
शुभ उपाय- केशरयुक्त दुधाचा नैवद्य दाखवा.
शुभ दान- मोहरीच्या तेलाचे दान करा.
शुभ अंक- 7
शुभ रंग- निळा
मीन: मीन राशीतील व्यक्तींनी आजच्या दिवशी अनुसूचित काम वेळेवर पूर्ण करा. साथीदारांची मदत लाभेल. माहेरच्या मंडळींकडून शुभ संकेत मिळतील. आरोग्य उत्तम राहील
शुभ उपाय- जेवणापूर्वी गाईला चपाती द्या.
शुभ दान- कोणत्यातरी गरजू व्यक्तीला आर्थिक मदत करा.
शुभ अंक- 2
शुभ रंग- पांढरा
आजचा दिवस तुम्हाला आनंददायी जावो ! तुमच्या मनातील सार्या इच्छा पूर्ण होवोत ही आमच्याकडून तुम्हांला सदिच्छा.