सावधान! Bird Flu परसतोय, 'ही' आहेत लक्षणे आणि कारणे
बर्ड फ्लू (फोटो सौजन्य- फेसबुक)

पटनामध्ये सध्या बर्ड फ्लू (Bird Flu) दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे संजय गांधी जैविक उद्यान बंद करण्यात आले आहे. तसेच प्राणीसंग्रहालयातील सहा मोरांचा सुद्धा मृत्यू झाला असून त्यांच्यामध्ये एच1एन1(H1N1) वायरस मिळाला आहे.बर्ल्ड फ्लू आजार हा एवियन इन्फ्लूएंजा वायरसमुळे परसतो. तसेच या आजाराची लागण झालेला पक्षी आणि व्यक्ती मार्फत पसरण्याचा धोका संभवतो. तर काही वेळेस यामुळे व्यक्तीचा मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता असते.

या आजारामुळे व्यक्तीला ताप आणि उलट्या होण्यास सुरुवात होते. तर भयंकर डोके दुखी, सांधेदुखी, न्युमोनिया, डोळ्यांना त्रास, घशामध्ये सूज येणे, कफ होणे, श्वसनाचे विकार आणि पोटाच्या समस्या उद्भवतात. मात्र ही लक्षणे व्यक्तीला कोंबड्यांमुळे किंवा फ्लू झालेल्या पक्ष्यांमार्फत होण्याची शक्यता जास्त वर्तविली जाते. तसेच व्यक्तीमध्ये बर्ड फ्लूची शिरकाव हा तोंड,नाक आणि डोळ्यांमार्फत होतो.

बर्ड फ्लू झालेल्या व्यक्तीने तातडीने डॉक्टरांकडे जाऊन योग्य ते उपचार घेणे. या आजारपणात तापासारखे वाटत असल्याने रुग्णाने पूर्णवेळ आराम करण्याचा सल्ला दिला जातो. तर बर्ड फ्लूची साथ परसली असल्यास मांसाहार करणे टाळावे, तोंडावर मास्क लावावा किंवा फ्लू झालेल्या पक्ष्यांपासून लांब राहावे असे ही डॉक्टरकांकडून सांगितले जाते.