अलिबाग
महाराष्ट्रातील अलिबाग हे सुंदर समुद्रकिनारी असलेले मुंबई जवळील एक सुंदर आणि रम्य ठिकाण आहे.शहराच्या धावपळीच्या जीवनातून काहीशी शांतता पाहिजे असल्यास अलिबाग हे ठिकाण अगदी योग्य आहे.अलिबागमध्ये काशीद बीचवर तुम्ही आनंद लुटू शकता. आणि अलिबागपासून थोडे पुढे गेल्यावर कोर्लई किल्ला आहे.
नाशिक
त्र्यंबकेश्वर मंदिर, रामकुंड यांसारखे प्रसिद्ध प्राचीन मंदिर असलेले सुंदर ठिकाण म्हणजे नाशिक आहे. नाशिकला गेल्यावर तुम्ही वणी, ब्रह्मगिरी टेकडी सारख्या सुंदर ठिकाणांचा आनंद घेऊ शकता. तसेच सुला सारख्या ठिकाणांचा ही आनंद लुटू शकता. ख्रिसमसच्या सुट्यामध्ये तुम्ही नाशिक हा जाऊ शकता. नाशिक हे एक उत्तम पर्याय आहे.
गणपतीपुळे
गणपतीपुळे हे महाराष्ट्रातील महत्वाचे ठिकाण आहे. गणपतीचे मंदिर आणि बीच असल्यामुळे तुम्ही देव दर्शनासह बीचचा आनंद घेऊ शकता. समुद्रकिनारा लाभलेल्या इतर ठिकाणांच्या तुलनेत गणपतीपुळे हे एक शांत आणि सुंदर ठिकाण आहे. दरम्यान तुम्ही खाण्याचे शौकीन असाल तर स्वादिष्ट कोकणी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेऊ शकता.गावातील बाजारपेठांमध्ये काही पारंपारिक हस्तकलेची खरेदी करू शकता.
भंडारदरा
भंडारदरा हे ठिकाण लेकसाठी प्रसिद्ध आहे. भंडारदरामध्ये तुम्ही बोटिंगचा ही आनंद लुटू शकता. भंडारदरा जवळ असलेल्या रतनगड किल्ल्याचा ट्रेक तुम्ही करू शकता, रंधा आणि अंब्रेला फॉल्सला भेट देऊ शकता आणि आर्थर तलावावर सूर्यास्तात बोटिंग करू शकता. कळसूबाई, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर भंडारदरा मार्गावर येते आणि हा ट्रेकिंगचा आणखी एक उत्कृष्ट पर्याय आहे.
Imagica
एप्रिल 2013 मध्ये उघडलेले Imagica हे सर्वात लोकप्रिय मनोरंजन थीम पार्कपैकी एक आहे. हे खोपोलीजवळ मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आहे आणि Imagica हे ठिकाण उद्यान थीम पार्क, स्नो पार्क आणि वॉटर पार्क या तीन मनोरंजन झोनमध्ये विभागले गेले आहे ज्यात मनोरंजनाच्या अनेक पर्याय आहेत ज्यात लाइव्ह शो, रोलर कोस्टर, वॉटर पार्क, थीमवर आधारित मनोरंजन शो आणि अगदी ताजेतवाने वॉटर पार्क यांचा समावेश आहे.