हळदीचे फायदे ( फोटो सौजन्य - फेसबुक )

आरोग्य उत्तम राहण्सासाठी लोक सातत्याने प्रयत्न करत असतात. तसेच शरीर सुदृढ रहावे म्हणून ही आयुर्वेदिक पद्धतीचे उपचार केले जातात. तर हळद ही आरोग्यासाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते.

- हळदीचे रोज सेवन केल्याने आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते. परंतु हळद योग्य प्रमाणात सेवन करणे आवश्यक असते. तसेच हळदीमध्ये करक्यूमिन हा मुख्य घटक असून त्याचे फक्त 500 मिलीग्राम सेवन करावे.

- आरोग्यासाठी उत्तम असलेल्या हळदीयुक्त गोळ्या बाजारात उपलब्ध होत आहेत. तर हळदीच्या सोबत काळी मिरीचे सेवन करणे आरोग्यदायी मानले जाते.

-ज्या लोकांना व्हायरल इन्फेक्शन होते, त्यांच्यासाठी हळदीचे दुध अतिशय गुणकारी ठरते. तर हळदीच्या सेवनाने सतत होणारी अॅलर्जी, ताप यापासून संरक्षण होते.

-हळदीमध्ये अॅन्टी व्हायरल आणि अॅन्टी बॅक्टेरिअल गुण असल्याने इन्फेक्शनपासून होणाऱ्या सर्दी, खोकल्यावर नियंत्रण मिळवता येते.

-लोकांना थंडीमध्ये संधीवाताचा त्रास होतो. थंडीमध्ये संधीवातापासून संरक्षण मिळण्यासाठी हळदीचे दूध फायदेशीर ठरते. हळदीच्या दुधामुळे पचनक्रिया सुधारते. हळद घातलेले दूध प्यायल्याने वजन कमी होण्यासही मदत होते.