जांभूळ , जो ब्लॅक प्लम म्हणूनही ओळखले जातो, जांभूळ खाण्याचे भरपूर पौष्टिक फायदे आहेत, आरोग्य तज्ञांनी सांगितले आहे की, हे फळ तुमच्या आहाराचा भाग नक्कीच असला पाहिजे. एचटी लाइफस्टाइलला दिलेल्या मुलाखतीत, क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आणि हेल्थ हॅबिटॅटच्या संस्थापक प्राची शाह यांनी सांगितले की, “जांभूळ उन्हाळ्यात हायड्रेशनसाठी आश्चर्यकारक काम करते कारण जांभूळमध्ये त्याच्या वजनापैकी 84% पाणी असते. जांभूळचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला फॉस्फरस, आयोडीन, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम सारखी खनिजे मिळतात, ज्यामुळे उन्हाळ्यात या तीव्र उष्णतेचा सामना करण्यासाठी तो एक उत्तम पर्याय बनतो. घामामुळे, आपण आपल्या शरीरातून भरपूर पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स गमावतो त्यामुळे इलेक्ट्रोलाइट्स पुनर्संचयित करण्याचे काम जांभूळ करते.” प्राची शाह पुढे म्हणाल्या की , “जांभूळमध्ये फायबर देखील असते जे जुनाट आजारांपासून बचाव करते आणि पचनसंस्थेला मजबूत करण्यास मदत करते. फळांमधील फायबरमुळे वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर ठरते. जांभूळ हे फळ व्हिटॅमिन सी चे एक उत्कृष्ट स्त्रोत देखील आहे ज्यामुळे तुमची त्वचा चांगली राहते. प्राचीन काळापासून, जांभूळचा उपयोग त्याच्या औषधी गुणधर्मांसाठी केला जातो. मधुमेह, त्वचेच्या समस्या, दमा, पोटदुखी, पोट फुगणे इत्यादी अनेक आरोग्यविषयक परिस्थितींवर उपचार करण्यासाठी जांभूळचा वापर केला जातो.”[हे देखील वाचा Should You Drink Lemon Water? आरोग्याच्या फायद्यांसाठी लिंबाचा रस टाकून कोमट पाणी पिण्याबद्दलची तथ्ये, पाहा परिणाम]
पोषणतज्ञ प्राची शहा म्हणाल्या, “संशोधनाने पुष्टी केली की जांभूळमध्ये अँटी बायोटिक गुणधर्म असतात त्यामुळे जांभूळ कर्करोग , हृदय आणि यकृताच्या आजारांवर उपचार करताना खूप प्रभावी आहे. जांभूळ हे लोह युक्त फळ आहे जे अत्यंत फायदेशीर आहे आणि अॅनिमिया ग्रस्त लोकांना जांभूळ खाण्याची शिफारस केली जाते. जांभूळमध्ये भरपूर प्रमाणात असलेले लोह हे रक्त शुद्ध करण्यासाठी नैसर्गिक फळ आहे, लाल रक्तपेशी आणि रक्तातील हिमोग्लोबिनची संख्या वाढवते.”
आहारतज्ञ गरिमा गोयल यांनी जांभूळ खाण्याचे काही फायदे सांगितले आहे:
1. थंड करण्याचे गुणधर्म - जांभूळमध्ये पाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे, जांभूळ नियमितपणे खाल्ल्याने डिहायड्रेशनचा धोका टाळता येतो.
2. रोग प्रतिकारशक्ती वाढवणारे गुणधर्म - व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स आणि व्हिटॅमिन सी समृद्ध, जांभूळमध्ये भरपूर अँटी-ऑक्सिडेंट आणि अँटी-इंफ्लेमेटरी आहे.
3. वजन कमी करणे - जांभूळ हे कमी-कॅलरी असलेले फळ आहे, जांभूळ तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारात जांभूळ निश्चितपणे समाविष्ट करू शकता.
4. निरोगी त्वचा - उन्हाळ्यात अनेकांना तोंड द्यावे लागणारी एक सामान्य समस्या म्हणजे मुरुम, डाग. जांभूळमध्ये तुरट गुणधर्म आहेत तसेच व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त आहे. ते उन्हाळ्यात, चमकदार आणि निरोगी त्वचेसाठी एक उपयोगी फळ आहे. जांभूळचे स्मूदी आणि सॅलड्सच्या रूपात आस्वाद घेतला जाऊ शकतो.