वैवाहिक जीवनासाठी जोडीदार निवडताना कन्फ्यूज करणारे प्रश्न

मुंबई: लग्नापूर्वी रिलेशनमध्ये असलेल्या आणि नसलेल्याही प्रत्येक तरूण, तरूणीला काही प्रश्न हमखास कन्फ्यूज करतात. हे प्रश्न दोघांपैकी कोणीही एकाने समोरच्याला विचारले तर, मनात गोंधळ हा ठरलेलाच. अनेकदा या प्रश्नांचे समर्पक उत्तर न मिळाल्याने चक्क विवाहासाठी नकारही मिळू शकतो. तसेच, तुमची प्रतिमा कारणाशिवाय नकारात्मकही होऊ शकते. त्यामुळे तुम्ही जर लग्नाच्या बोहल्यावर चढू इच्छित असाल तर, या प्रश्नांबाबत नक्की विचार करा. इतकेच नव्हे तर, ते विचारायचे किंवा नाही याबाबतही विचार करा.

नेमके काय आहेत ते प्रश्न

१- तूला कसा पती/पत्नी पाहिजे?

हा प्रश्न वरवर पाहात अगदी सोपा असला तरी, त्याचे उत्तर तितके सोपे नाही. कारण, जोडीदार निवडने म्हणजे वस्तू निवडने नव्हे. व्यक्तिमत्व, सवयी, विचार, अनुरूपता अशा अनेक गोष्टींचा विचार तुम्हाला एकाच व्यक्तिबाबत करावा लागतो. त्यामुळे शक्यतो हा प्रश्न थेट न विचारता समोरच्याला शक्य तितके जाणून घेणे केव्हाही चांगले.

२- तूला किती मित्र / मैत्रिणी आहेत, फेसबूक, व्हाट्सऍपवर तू तूझ्या मित्रांसोबत बोलतेस काय?

तंत्रज्ञान, इंटरनेट आणि खास करून सोशल मीडियाच्या आजच्या जगात हा प्रश्न तसा फारच बाळबोध म्हणावा लागेल. कारण, आजकाल लोक प्रत्यक्षात बोलत नाहीत इतके सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलत असतात. महत्त्वाचे म्हणजे त्यात काही गैरही नाही. त्यामुळे उगाच हा प्रश्न विचारून आपण किती संकुचित आहेत.

३- तूला किती बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड आहेत?

हा प्रश्न म्हटला तर, व्यक्तिगत आणि म्हटला तर, संतापात भर घालणारा. कारण, विवाहापूर्वी किंवा एकमेकांशी रिलेशन निर्माण होण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ती हा स्वतंत्र असतो. त्यामुळे व्यक्तिस्वातंत्र्याचा विचारात घेता बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंड हा मुद्दा व्यक्तिपरत्वे सोडावा लागेल. तसेच, तुला किती बॉयफ्रेंड हा तर निव्वळ संतापजनकच प्रश्न आहे. त्यावर न बोललेलेच बरे.

४- तूला पिरीयड (मासिक पाळी) किती तारखेला येतो?

हा प्रश्न बौद्धीक दिवाळखोरी दाखवणारा आहे. कारण, कोणत्याही तरूणीची मासिक पाळी ही पूर्णत: नैसर्गिक गोष्ट आहे. तसेच, ती शारीरिक बदल, आजार, ताण-तणाव, वैद्यकीय कारण आणि वातावरण यानूसार त्यात बदल होऊ शकतो. त्यामुळे उगाच नसत्या उठाठेवी न केलेल्याच बऱ्या.

५- मुलांबद्धल (लग्न झाल्यावर जन्माला येणाऱ्या) तूझे मत काय?

हा प्रश्न नक्कीच चांगला आहे. कारण, पालकत्व ही गोष्ट नक्कीच सोपी नाही. बदलता काळ त्यामुळे वाढत जाणाऱ्या जबाबदाऱ्या. त्यातून वाढणाऱ्या गरजा, जीवनाकडे पाहण्याची स्वतंत्र वृत्ती तसेच, सहजीवनात निर्माण होणारे प्रश्न आदींकडे पाहता या प्रश्नावर सुरूवातीलाच नक्की विचार व्हायला हवा. पण, पहिल्याच भेटीत हा प्रश्न विचारून समोरच्याला गारद करण्याची मुळीच गरज नाही. समोरच्याच्या विचरांचा कल आणि मुड लक्षात घेऊन हा प्रश्न विचारण्यास काहीच हरकत नाही.

६- आता सांग बरं माझा स्वभाव तूला कसा वाटला?

हा प्रश्न विचारणे म्हणजे आपला विचार समोरच्यावर लादने होय. कारण शक्यतो कोणतीही व्यक्ती तोंडावर तुम्हाल वाईट म्हणणार नाही. हे जर आपल्याला माहिती आहे तर, मग उगाच प्रश्न विचारून स्वत:ची आरती ओवाळून कशाला घ्यायची?

७- लग्ननंतर मी माझ्या मित्र/मैत्रिणींबसोबत फिरलेले किंवा त्यांना घरी आणलेले चालेल का?

खरेतर हा प्रश्नच होऊ शकत नाही. पण, काही मंडळींना याबाबत आक्षेप असू शकतो. हा प्रश्नही तसा मनात काहीसा संभ्रम निर्माण करणाराच.