Akash Ambani-Shloka Mehta Wedding Reception: देशातील बडे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) ह्यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) यांच्या लग्नाचे रिसेप्शन नुकतेच मुंबईत पार पडले. त्यावेळी देश विदेशातील मंडळींपासून ते बॉलिवूड मधील दिग्गज कलाकारांनी या पार्टीसाठी उपस्थित होते. तर सोशल मीडियावर आकाश आणि श्लोका यांच्या दोघांच्या लग्नापासून ते रिसेप्शन पर्यंतचे फोटो व्हायरल होत आहेत.
त्यानंतर आता इंटरनेटवर आकास आणि श्लोका यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये आकाश श्लोका मेहता (Shloka Mehta) हिचे सर्वांसमोर चुंबन घेताना या व्हिडिओमधून दिसून येत आहे.(Akash Ambani-Shloka Mehta Wedding Reception: आकाश अंबानी-श्लोका मेहता यांची रिसेप्शनमधील पहिली झलक! (Photo)
तसेच दोघे ही कपल्स डान्स करत असतानाच आकाश श्लोकाचे चुंबन घेतो. यामुळे श्लोका लाजून थोडी पुढे जाते. या सर्व प्रकार दरम्यान पार्टीसाठी उपस्थित असलेली मंडळी अतिउत्साहात दिसून येत आहेत.10 मार्च रोजी पोस्ट वेडिंग सेलिब्रेशनची धूम होती. या सेलिब्रेशनमध्ये आकाश-श्लोकाचे 'मंगल पर्व' पार पडले. या सेलिब्रेशनमधील आकाश-श्लोकाचा पहिली झलक समोर आली आहे. आकाशने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला असून श्लोकाने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे.