Akash Ambani-Shloka Mehta Wedding Reception (Photo Credit: Instagram)

भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani) आणि श्लोका मेहता (Sholka Mehta) यांचा शाही विवाहसोहळा 9 मार्च रोजी संपन्न झाला. मुंबईतील जिओ गार्डनमध्ये रंगलेल्या या सोहळ्यात अनेक दिग्गजांसह बॉलिवूड स्टार्सने देखील हजेरी लावली. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान, सलमान खान, प्रियंका चोप्रा, रणबीर कपूर यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकार विवाहसोहळ्यात उपस्थित होते. आकाश अंबानी याच्या लग्नात प्रियांका आणि ऐश्वर्या एकत्र पहिल्यांदाच थिरकताना दिसल्या (Video)

10 मार्च रोजी पोस्ट वेडिंग सेलिब्रेशनची धूम होती. या सेलिब्रेशनमध्ये आकाश-श्लोकाचे 'मंगल पर्व' पार पडले. या सेलिब्रेशनमधील आकाश-श्लोकाचा पहिली झलक समोर आली आहे. आकाशने लाल रंगाचा कुर्ता परिधान केला असून श्लोकाने गुलाबी रंगाचा लेहेंगा घातला आहे. यात दोघेही अत्यंत सुरेख दिसत आहेत. आकाश अंबानी सोबत वरातीमध्ये थिरकला शाहरुख खान, करण जोहर आणि रणबीर कपूर (Watch Video)

 

View this post on Instagram

 

#akashambani #shlokamehta wedding ❤️#bigfatindianwedding #desibride #weddingoftheyear @viralbhayani

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

यापूर्वी आकाश-श्लोकाचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन स्विर्झरलँडला पार पडले. तर लग्नानंतर झालेल्या रिसेप्शनला सेलिब्रेटींची मांदीयाळी पाहायला मिळाली.