63rd Dhammachakra Pravartan Din 2019 (Photo Credit: Wikimedia)

65 वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील दिक्षाभूमीवर जय्यत तयारी सुरु आहे. याचबरोबर दिक्षाभूमी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायींनी मोठ्या प्रमाणाच गर्दी करायला सुरुवात केली आहे. या ठिकाणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदु धर्माचा त्याग करुन बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. यामुळे देशातील अनेक राज्यातून लोक येथे भेट देण्यासाठी येतात. तसेच या परिसरात भव्य सोहळा पार पाडला जातो. महत्वाचे म्हणजे या दिवशी दिक्षाभूमीवर अनेक राजकीय पक्षातील नेते आवर्जून उपस्थित राहतात. परंतु, यावर्षी आचारसंहिता लागू असल्यामुळे राजकीय नेत्यांची कमतरता जाणवणार आहे.

विजयादक्षमीच्या दिवशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली हिंदु धर्माचा त्याग करुन बौद्ध धर्म स्वीकारला होता. यामुळे दसऱ्याच्या दिवशी डॉ.बाबासाहेब यांच्या अनयायींची या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर दिक्षाभूमीचा परिसर आकर्षित असा सजवला जातो. एवढेच नव्हेतर या परिसरात सांकृतिक कार्यक्रम राबवले जातात. यातून लोकांना योग्य ते मार्गदर्शनही केले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही भव्य सोहळा पार पाडला जाणार आहे. यामुळे प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. हे देखील वाचा- Mahatma Gandhi Jayanti 2019 Quotes: महात्मा गांधी यांचे आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने बघणारे '5 प्रेरणादायी विचार'

धम्मचक्र दिनानिमित्त या परिसरात राजकीय नेत्यांकडून भाषण केली जातात. परंतु, यावर्षी आचारसंहिता लागू असल्यामुळे या ठिकाणी कोणतेही राजकीय कार्यक्रम होणार नाहीत, अशी शक्यता वर्तवली जात आहे.