
सणासुदीच्या दिवसात कितीही नाही म्हटले तरी मन भरेल तेव्हढे खाणे होतेच. दिवाळीत बनलेले गोडाधोडाचे पदार्थ, दिवाळी फराळ, जेवणासाठी बनलेले काही खास पदार्थ, वेगवेगळ्या मिठाई अशा सर्व पदार्थांना पोटात जागा करून दिली जाते. हे पदार्थ खाताना चविष्ट लागतात मात्र एकदा का दिवाळी संपली, आरोग्याच्या विशेषतः पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात. त्यामुळे आता दिवाळीनंतर शरीर डिटॉक्स करणे गरजेचे आहे. म्हणजेच शरीरातील अपायकारक घटक शरीराबाहेर फेकणे. चला तर पाहूया अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला तुमचे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करतील.
लिंबू –
लिंबात मुबलक प्रमाणात विटामीन सी असते. लींबूमुळे तुम्ही सर्दी आणि खोकल्यापासून स्वतःचा बचाव करू शकता. तसेच पचनशक्ती सुधारण्यासाठीदेखील लिंबू फायदेशीर आहे. लिंबाची साल देखील अँटी ऑक्सिडेट्स असते यामुळे डिटॉक्सिफिकेशन अधिक होते.
मध –
लिंबू आणि पाण्यासोबत मध घेतल्याने बाउल मुव्हमेंट योग्य प्रकारे होतात. तसेच पोटाचे विकार बरे होऊन शरीरातील विषारी पदार्थ बाहेर फेकले जातील.
ग्रीन टी –
असे म्हटले जाते की एक ग्रीन टीचा कप हा दहा पुरींच्या बरोबरीचा आहे. त्यामुळे शरीरातील तेलकट तुपकट पदार्थ बाहेर टाकण्यासाठी ग्रीन टीचा अतिशय फायदा होतो. तसेच यात डीटॉक्स एजंट असणारे कॅटेचिन आढळते जे लिव्हरच्या आरोग्यासाठीही फायदेशीर असते.
टोमॅटो -
सणांच्या दिवसात जास्त हेवी जेवण झाले असेल तर तुम्ही टोमॅटो सूप किंवा सलाद खाऊ शकता, याने तुम्हाला हलके वाटेल. टोमॅटोमुळे पोट थंड ठेवण्यासही मदत होईल.
पालक आणि सफरचंद –
सणाच्या काळात आपण जे पदार्थ खातो त्यामुळे मुख्यत्वे fats आपल्या शरीरात प्रवेश करतात. यामुळे शरीराचा बॅलन्स थोड्याफार प्रमणात बिघडतो अशावेळी फायबरयुक्त पदार्थ खाल्ल्याने आरोग्याचा पूर्णपणे समतोल राखला जातो. यासाठी पालक, सफरचंद हे पदार्थ खावेत. अथवा यांचे सूप आणि ज्यूस घ्यावा.