zomato

Viral Video: झोमॅटोचे संस्थापक आणि सीईओ दीपंदर गोयल यांनी एका महिलेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर  प्रतिक्रिया दिली आहे. व्हिडिओमध्ये महिला झोमॅटोचा टी-शर्ट परिधान करताना आणि बॅग घेऊन दुचाकी चालवत असल्याचे दिसून येते. महिलाही हेल्मेटशिवाय दुचाकी चालवताना दिसत आहे. मध्य प्रदेशातील इंदूरमधील झोमॅटोच्या मार्केटिंग हेडची ही कल्पना असल्याचे सांगत हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा व्हिडिओ इंदूरच्या विजयनगरचा असल्याचा दावाही केला जात आहे.

दीपंदर गोयल यांनी त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर जाऊन असा दावा केला आहे. ते म्हणाले की झोमॅटोचा याच्याशी काहीही संबंध नाही आणि त्यांच्याकडे इंदूरमध्ये कोणतेही विपणन प्रमुख नाही आणि झोमॅटो हेल्मेट-लेस रायडिंगला प्रोत्साहन देत नाही. झोमॅटोसाठी शेकडो महिला फुड डिलेवरी  करत आहेत, असेही त्यांनी सांगितले. झोमॅटोसाठी फुड डिलेवरी करून त्यांची आणि त्यांच्या कुटुंबासाठी उदरनिर्वाह करतात. त्यांना त्यांच्या कामाच्या नैतिकतेचा अभिमान असल्याचेही त्यांनी सांगितले.

व्हायरल झालेल्या व्हिडिओला दीपंदर गोयल यांनी उत्तर दिले, "अरे! आमचा याच्याशी काहीही संबंध नव्हता. आम्ही हेल्मेट-लेस बाइक चालवण्यास मान्यता देत नाही. तसेच, आमच्याकडे 'इंदूर मार्केटिंग हेड' नाही."