Shocking Video: हरियाणाच्या अंबाला रेल्वे स्थानकावर (Ambala Railway Station) एका तरुणाने ओएचई (ओव्हर हेड इक्विपमेंट) खांबावर चढून आत्महत्येचा (Suicide) प्रयत्न केला. अंबाला कॅन्टोन्मेंट रेल्वे स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवर ही घटना घडली. या घटनेचे स्थानकावरील प्रवाशांनी रेकॉर्डिंग केले असून या घटनेचा भयानक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये तरुण हाय टेंशनच्या विद्युत तारांना हात लावून आत्महत्या करताना दिसत आहे. तरुणाने हाय व्होल्टेज ओव्हरहेड वायरला स्पर्श केल्याने स्फोट झाला. ही घटना घडली तेव्हा अनेक प्रवासी आणि रेल्वे संरक्षण (RPF) कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते.
हा तरुण आत्महत्या करत असताना त्याला स्थानकावरील कोणीही थांबवले नाही. उपस्थितांनी या घटनेचे मोबाईल फोनवर चित्रीकरण सुरू केले. या तरुणाच्या आत्महत्येचा थरार उपस्थितांच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. रोहित असे मृत तरुणाचे नाव असून तो छत्तीसगडमधील जांजगीर जिल्ह्यातील चंपा गावात राहत होता. विजेचा धक्का लागल्याने रोहित रुळावर पडल्यानंतर घटनास्थळी उपस्थित आरपीएफ जवानांनी डॉक्टरांना बोलावले. त्यानंतर त्याला उपचारासाठी छावणी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रोहितची प्रकृती खालावल्याने त्याला पीजीआय चंदिगडमध्ये रेफर करण्यात आले. (वाचा - Delhi Metro Viral Video: दिल्ली मेट्रो मध्ये एका महिलेचा दोन पुरूषामध्ये जबरदस्तीने बसण्याचा प्रयत्न; नियम पाळत असल्याचा करत राहिली दावा (Watch Video))
पहा व्हिडिओ -
देखिए अम्बाला रेलवे स्टेशन पर युवक ने किया सुसाइड #वायरलवीडियो pic.twitter.com/9WO8GH5sEb
— Lavely Bakshi (@lavelybakshi) March 13, 2024
डॉक्टरांनी दावा केला आहे की, रोहितच्या संपूर्ण शरीरावर गंभीर जखमा झाल्या. ओव्हरहेड उपकरणावरून पडल्यामुळे त्याचा पाय फ्रॅक्चर झाला. रोहितने आपल्या मित्रांसोबत छत्तीसगडला जात असल्याचं त्याच्या नातेवाईकांना सांगितलं होतं. सोमवारी त्याने मित्राच्या फोनवरून फोन करून 200 रुपये मागितले आणि पैसे संपल्याचे सांगितले.