burn | Representational Purpose | (Photo Credits: Pixabay)

अरुंधती हा तेलगू चित्रपट पाहून 23 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केली आहे. घटना कर्नाटकातील (Karnataka) तुमकरू जिल्ह्यातील आहे. जिथे हा तरुण अरुंधती चित्रपटाची कॉपी करत होता. अरुंधती हा एक तेलुगु हॉरर चित्रपट आहे. जो या तरुणाने 15 वेळा पाहिला आहे. तरुण चित्रपट पाहून भुताटकीमध्ये इतका तल्लीन झाला होता की, त्याने अकरावीनंतरचे शिक्षणही सोडले होते. रेणुका प्रसाद असे या तरुणाचे नाव आहे, ज्याच्या कुटुंबीयांनी सांगितले की तो अभ्यासात खूप वेगवान होता आणि नेहमी त्याच्या वर्गात अव्वल असायचा. त्याला चित्रपटाचे इतके व्यसन लागले की त्याने आपले शिक्षणही सोडले.

घरच्यांनी त्याला चित्रपट पाहण्यास मनाई देखील केली पण तो मान्य झाला नाही. हा तरुण त्याच्या घरच्यांशी चित्रपटाची कॉपी करण्याबाबत बोलत असे, मात्र कुटुंबीयांनी त्याला कसेतरी समजावले. नंतर त्याने स्व:तला आग लावल्याचे कुटुंबीयांना दिसले.  तरुणाने चित्रपटातील एक दृश्य कॉपी करण्याचा प्रयत्न केला. चित्रपटाच्या नायकाप्रमाणेच रेणुका प्रसादने बुधवारी गावाच्या बाहेरील भागात सुमारे 20 लिटर पेट्रोल त्याच्या अंगावर ओतले. हेही वाचा Suicide: कौटुंबिक वादातून महिलेची आत्महत्या, हुंडाबळीच्या आरोपाखाली पती अटकेत

रस्त्याने जाणाऱ्या काही लोकांनी त्याला आगीच्या ज्वाळांमध्ये पाहिले आणि त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. तो 60 टक्के भाजला होता आणि दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला. त्याच्या वडिलांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोडीगणहल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल करून घटनेचा तपास सुरू केला आहे.  रेणुका प्रसाद यांच्या आत्महत्येमुळे त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख झाले आहे. माहिती मिळताच सर्व नातेवाईक, शेजारी आणि स्थानिक लोकांना धक्का बसला.

त्याचे वडील म्हणाले, त्याने चांगला अभ्यास करावा आणि चांगले करिअर करावे अशी आमची इच्छा होती. दुर्दैवाने सिनेमाच्या व्यसनाने त्याचा जीव घेतला. तेलुगू सुपरहिट चित्रपट अरुंधतीमध्ये अभिनेत्रीचा तिच्या इच्छेनुसार मृत्यू होतो आणि शत्रूचा बदला घेण्यासाठी तिचा पुनर्जन्म होतो. या चित्रपटापासून प्रेरित होऊन रेणुका प्रसाद यांनी त्यांच्या इच्छेनुसार स्वतःला मारले आणि त्यांना पुन्हा जन्म घ्यायचा होता.