Muzaffarnagar Gang Rape: मुझफ्फरनगरमधून (Muzaffarnagar) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे मेहुण्याने (Brother-in-law) प्रथम त्याच्या मेहुणीवर बलात्कार (Rape) केला. यानंतर त्याने आपल्या मेहुणीचा गळा दाबून खून (Murder) केला. एवढेच नाही तर नंतर मृतदेह पेट्रोल ओतून जाळला. बेपत्ता मुलीचा शोध घेत असलेल्या पोलिसांना जेव्हा मेहुण्यावर संशय आला तेव्हा हत्येचा खुलासा झाला. मेरठ जिल्ह्यातील कोल गावातील रहिवासी असलेल्या आशिषचा विवाह लॉकडाऊन दरम्यान मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बुढाणा पोलीस स्टेशन परिसरातील बवाना गावातील रहिवासी ऋषिपाल यांची मुलगी पारुलशी झाला होता.
मेहुण्याचे मेहुणीसोबत अनैतिक संबंध -
आशिषचे त्याची मेहुणी, मृत प्रियांका हिच्याशी अवैध संबंध होते. ज्यामुळे प्रियांका त्याला अनेकदा ब्लॅकमेल करत असे आणि या गोष्टीला कंटाळून आशिषने त्याच्या मेहुणी प्रियांकाची सुनियोजित पद्धतीने हत्या केली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून मृत मुलीच्या शरीराचे अवशेष आणि कपडे जप्त केले. पोलिसांनी आरोपी मेहुण्याला अटक केली आहे. खून करणारे कॉन्ट्रॅक्ट किलर शुभम आणि दीपक अजूनही फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. (हेही वाचा - Pune Rape Case: बोपदेव घाटात फिरण्यासाठी आलेल्या तरुणीवर बलात्कार, तीन आरोपींवर गुन्हा दाखल)
तरुणीवर सामूहिक बलात्कार -
23 जानेवारी रोजी महिलेच्या कुटुंबाने तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली, ज्यामुळे या प्रकरणाची चौकशी सुरू झाली. अधिकाऱ्यांना असे आढळून आले की, आशिष तिच्यावर त्याच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव आणत होता. त्याने त्याच्या साथीदारांसह महिलेला आमिष दाखवून पळवून नेले, तिच्यावर सामूहिक बलात्कार केला आणि नंतर तिचा गळा दाबून खून केला. (हेही वाचा- लेकीच्या अपहरणाची तक्रार घेऊन आला बाप अन त्याच्याच कूकर्माचा झाला उलगडा; पोटच्या लेकीवर 5 वर्ष करत होता लैंगिक अत्याचार)
आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली -
आरोपी आशिषची सविस्तर चौकशी केली असता त्याने कबूली दिली की, मुलीला मारण्यापूर्वी या तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला होता. त्यानंतर त्यांनी तिच्याच दुपट्ट्याने तिचा गळा दाबून खून केला. हत्या करण्यात आल्यानंतर तरुणीला पेट्रोल टाकून जाळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आरोपींनी घटनास्थळी उपलब्ध असलेले सर्व पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. (वाचा: Palghar Rape Case: पालघर हादरलं, 12 वर्षीय मुलीवर बलात्कार, आरोपीला अटक)
दरम्यान, अधिक पुरावे गोळा करण्यासाठी फॉरेन्सिक तपासणी सुरू आहे. आरोपी मेहुण्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस इतर दोन आरोपींचा शोध घेत आहेत. अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की, या घृणास्पद गुन्ह्यासाठी जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल.