Representative Image (Photo Credits: Pixabay)

Pune Rape Case: पुणे आणि गुन्हेगारी हे कोडं काही सुटना. शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहून नागरिक संतापले आहे. बोपदेव घाट परिसरात एका २१ वर्षीय तरुणीवर तीन अज्ञातांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण शहर हादरले आहे. ही घटना गुरुवारी घडली असून शुक्रवारी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण पाहून नागरिक संतापले आहे. (हेही वाचा-  लेकीच्या अपहरणाची तक्रार घेऊन आला बाप अन त्याच्याच कूकर्माचा झाला उलगडा; पोटच्या लेकीवर 5 वर्ष करत होता लैंगिक अत्याचार)

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा पोलिस ठाण्यात या घटनेविषयी एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तरुणी आपल्या मित्रासोबत रात्री बोपदेव घाटात फिरण्यासाठी आली होती. त्याचवेळीस अचानक तीन जण तीच्या जवळ आले आणि तीच्यावर बळजबरी करू लागले. तिच्या मित्राला मारहाण करत त्याला गंभीर जखमी केले. पीडितेवर तिघांन्ही बलात्कार केला. घटनेमुळे पीडितेला गंभीर दुखापत झाली. तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तीच्यावर सद्या उपचार सुरु आहे.

या घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी तीन अज्ञातांवर गुन्हा दाखल केला. आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. पोलिसांनी या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, १० पथक नेमले आणि आरोपींचा शोध सुरु झाला. आरोपींच्या शोधासाठी आणि अटकेसाठी गुन्हे शाखा आणि डिटेक्टिव्ह ब्रँचची दहा पथके तयार करण्यात आली अशी माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. कोंढवा भागात गेल्या अनेक दिवसांपासून गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी पोलिसांसमोर सुरक्षतेचा प्रश्न उभा केला आहे.