उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. 112 या टोल फ्री (Toll Free) क्रमांकावर कॉल करण्यात आला होता. फोन करणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात लखनऊमध्ये (Lucknow) गुन्हा हा दाखल करण्यात आला आहे. फोन करुन आरोपीने मी लवकरच मुख्यमंत्री योगींना ठार मारणार आहे. असे म्हटले. उत्तर प्रदेशात 112 हा टोल फ्री क्रमांक आपातकालीन परिस्थीतीमध्ये वापरण्यासाठी आहे. यावरच फोन करुन आरोपीने ही धमकी दिली आहे.
ही धमकी येताच हा फोन घेणाऱ्या ऑपरेटरने पोलिसात तक्रार दिली आहे. ज्यानंतर कलम 506, कलम 507 आणि आयटी अॅक्ट कलम 66 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणात लखनऊच्या सुशांत गोल्फ सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धमकी देणारा अज्ञात कोण आहे? याचा शोध पोलीस घेत आहेत. शिखा अवस्थी यांनी हा धमकीचा फोन उचलला होता.
दरम्यान एक आठवड्यापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ यांना ठार करण्याची धमकी देण्यात आली होती. ही फेसबुक पोस्ट बागपला राहणारे अमन रजा यांच्या प्रोफाईलवरून शेअर करण्यात आली होती. ही पोस्ट व्हायरल झाली होती. ज्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत आरोपीला अटक केली होती.