Yamuna Accident: दाट धुक्यांमुळे चार वाहनाच्या धडकेत भीषण अपघात, एकाचा मृत्यू, ९ जखमी
Fog| PC: Twitter

Yamuna Accident:  दाट धुक्यामुळे अनेक अपघात झालेले आहे. दरम्यान काल रात्री यमुना एक्सप्रेसवेवर (Yamuna Expressway) दाट धुक्यामुळे भीषण अपघात झाल्याचे समोर येत आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहे. अनेक वाहने एकमेकांवर आदळल्याने अपघात झाल्याची माहित मिळाली आहे. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांना या अपघाताची माहिती मिळताच, अपघातस्थळी पोहचले. (हेही वाचा- जम्मू - जालंधर राष्ट्रीय महामार्गावर अपघात, कार आणि ट्रकच्या धडकेत चार जणांचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, यमुना एक्सप्रेसवेवर दाट धुक्यांमुळे वाहने एकमेंकावर आढळली आणि अपघात झाला.या अपघातात एकाचा मृत्यू झाला. अपघातामुळे बराच वेळ वाहतुक कोंडी झाली होती. पोलिस घटनास्थळी येताच, त्यांनी सर्व वाहने एका बाजूला केली आणि वाहतुक सेवा सुरळीत केली. अपघातानंतर रस्त्यावर गोंधळ निर्माण झाला होता. पोलिसांनी अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथे जखमींवर उपचार सुरु असल्याची माहिती मिळत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवार पोलिस स्टेशन हद्दीतील नोए़डाहून आग्राकडे जाणाऱ्या रस्त्यावर सुमारे ३० किमी पुढे गेल्यावर दाट धुक्यामुळे मागून येणाऱ्या एका बसची वाहनाला धडक बसली. यानंतर मागून येणाऱ्या अन्य दोन कारही बसला धडकल्या आणि यामध्ये ९ जण जखमी झाले आहे. या अपघातात सत्य प्रकाश या व्यक्तीचा मृत्यू झाला. सत्य प्रकाश हा इटावा जिल्ह्यातील कोयला सरैया गावातील रहिवासी होता. काल रात्री 2 वाजता नोएडाहून आग्राला जात असताना हा अपघात झाला. हे प्रकरण जेवर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे.