अटकपूर्व जामीन प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, जर एखादी मुलगी स्वत:च्या मर्जीने एखाद्या व्यक्तीसोबत राहत असेल आणि यादरम्यान दोघांमध्ये शारीरिक संबंध असेल. मात्र जेव्हा नाते तुटते, तेव्हा तरुणावर बलात्काराचा गुन्हा दाखल करता येत नाही. न्यायमूर्ती हेमंत गुप्ता (Hemant Gupta) आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ (Vikram Nath) यांच्या खंडपीठाने भारतीय रेल्वेतील सहाय्यक लोको पायलटने दाखल केलेल्या याचिकेवर त्यांना जामीन मंजूर केला. आयपीसीच्या कलम 371(2)(एन), 377 आणि 506 अंतर्गत सहाय्यक लोको पायलटविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि राजस्थान उच्च न्यायालयाने त्याला अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिला होता. या प्रकरणात राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला अपीलकर्त्याच्या वतीने आव्हान देण्यात आले होते.
कोर्टाने सांगितले की, तक्रारदार तरुणीचे चार वर्षांपासून तरुणासोबत संबंध होते. दोघांमध्ये शारीरिक संबंधही निर्माण झाले होते. आता दोघांमध्ये कोणताही संबंध नसल्यामुळे, आयपीसीच्या कलम 376 (2) (एन) अंतर्गत एफआयआरचा आधार असू शकत नाही. राजस्थान उच्च न्यायालयाचा आदेश बाजूला ठेवत खंडपीठाने सांगितले की, अटक झाल्यास जामीन मागणाऱ्या अपीलकर्त्याला जामीन दिला जाईल आणि तो प्रलंबित तपासात सहकार्य करेल.
तरुणीचा न्यायालयासमोर युक्तिवाद
त्याचे आणि फिर्यादी तरुणीचे 2015 पासून सहमतीचे संबंध असल्याचा युक्तिवाद अपिलार्थी तरुणाच्या वतीने न्यायालयासमोर करण्यात आला. संबंध संपुष्टात आल्यानंतर तरुणीच्या वतीने कलम 376 (२), 377 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. (हे देखील वाचा: मोठ्या भावाच्या लग्नानंतर वहिनीसोबत दीराचे जुळले सूत; पतीला घटस्फोट न देता महिलेनेही थाटला दीरासोबत दुसरा संसार)
तरुणाने कोर्टात सांगितले की, 2015 मध्ये जेव्हा तो 18 वर्षांचा होता. यादरम्यान त्याचे 20 वर्षीय तरुणीसोबत संमतीने संबंध होते. मुलीने दुसऱ्याशी लग्न केले होते. या तरुणाला याची काहीच कल्पना नव्हती. जामीन मागणाऱ्या तरुणाचे वकील अर्जुन सिंह भाटी यांनी सांगितले की, 2021 मध्ये त्याला सरकारी नोकरी मिळाली. त्यानंतर दोघेही वेगळे झाले. 2019 मध्ये दोघांमध्ये कोणताही संबंध नव्हता. असे असतानाही तरुणाचा छळ करण्यासाठी तरुणीच्या वतीने खोटे गुन्हे दाखल करण्यात आले. तरुणीने पैसे उकळण्यासाठी दाखल केलेल्या गुन्ह्यात तरुणीच्या वतीने तरुणाचे वडील आणि भावालाही आरोपी करण्यात आले होते.