मोठ्या भावाच्या लग्नानंतर वहिनीसोबत दीराचे जुळले सूत; पतीला घटस्फोट न देता महिलेनेही थाटला दीरासोबत दुसरा संसार
Marriage | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

दीर-वहिनीचे अनेक अचाट किस्से तुम्ही ऐकले असतील पण गोरखपूर मध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये एका महिलेने आपल्या पतीला घटस्फोट न देता दीरासोबतच दुसरं लग्न केले आहे. या पहिलेने पहिल्या पतीसोबत लग्न केल्यानंतर काही दिवसांतच तिचे दीरासोबतही संबंध आले. दीरानेही वहिनीसोबत लग्न करण्याचं वचन दिलं आणि आपले संबंध कायम ठेवले. नंतर लग्नाला नकार दिला. पुढे महिला सारा प्रकार घेऊन पोलिस स्टेशन मध्ये पोहचली तेव्हा तिला दीराने साथ देत लग्नाचं वचन पूर्ण केले.

दरम्यान या लग्नातील आश्चर्यकारक बाब म्हणजे या महिलेचा पहिला पती देखील या लग्नात उपस्थित होता. महिलेने त्याला घटस्फोट देखील दिलेला नाही. या लग्नाचा सारा गोंधळ आता पोलिस स्टेशन मध्ये पोहचला आहे. पोलिस स्टेशन मध्ये त्यांनी एकमेकांना वरमाला घातल्या, भांगेत सिंधूर भरण्याचा विधीही पार पडला.

गोरखपूर मध्ये चौरी चौरा पोलिस स्टेशन मध्ये हा सारा प्रकार घडला. सोनबरसा भागात व्यावसायिकाच्या मुलाचं लग्न पिपराईच ठाण्यातील उनौला मध्ये झालं. लग्नानंतर काही दिवसांत मुलगा शारिरीक रित्या विकलांग झाला. उपचारानंतरही त्याच्यामध्ये कोणता सकारात्मक बदल झाला नाही. मग दीर आणि वहिनी जवळ आले. त्यांच्यामध्ये शारिरीक संबंध देखील झाले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. नक्की वाचा: Gurugram Shocker: Wife-Swapping Parties मध्ये पत्नीवर जबरदस्ती करणारा पती अटकेत .

दीराने लग्नाचं वचन देऊनही काही महिन्यात पलटी मारली होती. मग ही महिला चौरी चौरा पोलिसांकडे पोहचली. पोलिसांनी दोन्ही पक्षांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मग मनधरणीनंतर त्यांचा लग्नाचा निर्णय पक्का झाला. या लग्नाला दोन्ही कुटुंबातील वडीलधारी देखील उपस्थित होते.