Gurugram Shocker: Wife-Swapping Parties मध्ये पत्नीवर जबरदस्ती करणारा पती अटकेत
Arrest । Image Used For Representational Purpose (Photo Credits: Facebook)

Wife-Swapping Parties मध्ये सहभागी होण्यासाठी पत्नीवर जबरदस्ती केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणामध्ये पत्नीने तक्रार केली आहे. महिलेच्या माहितीनुसार, पती दिल्ली मध्ये वाईफ स्वॅपिंग पार्टीमध्ये सहभागी करत त्याच्या भावासोबतच शारिरीक संबंध ठेवण्यासाठी जबरदस्ती करत होता. कोर्टाच्या आदेशावरून युपी पोलिसांनी पतीला आणि त्याच्या भावाला अटक केली आहे.

मुझफ्फरनगरच्या कोर्टामध्ये पीडीतेने दिलेल्या माहितीमध्ये तिचा गुरूग्रामचा रहिवासी आणि व्यावसायिक पती कसा जबरदस्ती तिला पार्ट्यांना घेऊन जायचा, धमकवायचा याचा पाढा वाचला. जून 2021 मध्ये हे जोडपं विवाहबद्ध झालं होतं. लग्नानंतर ते गुरूग्रामला आले. हा तिचा दुसरा पती होता. Crime: भावाच्या मदतीने पतीची गळा चिरून हत्या, पत्नी फरार, एकास अटक .

वाईफ स्वॅपिंग पार्टीमध्ये जाण्यास नकार दिला तर पती लैंगिक छळ करायचा, मारझोड करायचा असा दावा देखील तिने केला आहे. 24 एप्रिल दिवशी तिने गुरूग्राम पोलिसांना सारा प्रकार सांगण्यासाठी निघताच पतीच्या गुंडांनी वाट धरली. जर काही सांगितलं तर जीवे मारू अशी धमकी देखील दिली.

न्यू मंडी पोलिस स्टेशनचे स्टेशन हाऊस ऑफिसर Sushil Kumar Saini,यांनी दिलेल्या माहितीनुसार, पती आणि दीराविरूद्ध गुन्हा दाखल करून घेण्यात आला आहे. यामध्ये कलम 376, 307,323,504 आणि 506 चा समावेश आहे.