Delhi Crime: नवी दिल्ली पोलिसांच्या सहाय्यक आयुक्ताच्या मुलाचा अपहरन केले आणि त्यानंतक 23 जानेवारी रोजी मुलाला कालव्यात ढकलून त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. लक्ष्य चौहान (वय वर्ष 26) असं मृत तरुणाचे नाव आहे. त्याला शोधण्यासाठी पोलिसांनी पथक नेमलं होतं. लक्ष्य हा दिल्ली पोलिसातील एसीपी यशपाल सिंग यांचा मुलगा होता. लक्ष्य यांचे मित्रासोबत पैशावरून वाद झाल्याने त्याच्या मित्राने अपहरन करून हत्या केल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा- क्षुल्लक कारणावरून वाद, मैत्रिणीची हत्या, आरोपीला सहा तासांत अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीतील एसीपीच्या मुलाची त्याच्याच दोन मित्रांनी 23 जानेवारी रोजी हत्या केली होती. लक्ष्य आणि त्याचे मित्र, हरियाणातील भिवानी येथे लग्नासाठी गेले होते. दोन आरोपींनी त्याला हरियाणातील मुनक कालव्यात ढकलले होते. कालव्यातून मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. पोलिसांनी नरेला येथून अभिषेक नावाच्या एका आरोपीला अटक केली आणि चौकशी सुरु केली. त्यानंतर पोलिस पथक नेमून विकास नावाच्या अन्य आरोपीला पकडण्यासाठी शोधमोहीम सुरु केली. पोलिसांनी कलम ३०२ हत्या आणि २०१ अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे.
चौकशीतून असे समोर आले की, लक्ष्य हा कायदा आणि दिल्ली तीस हजारी कोर्टात प्रॅक्टिस करत होता, विकास एका वकिलाचा लिपिक म्हणून काम करत होता. लक्ष्यने विकासकडून पैसे घेतले होते. ते पैसे परत देत नसल्याने विकासने हत्या केल्याचे समोर आले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हरियाणातून परतीचा प्रवास करत असताना, हत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिस एका फरार आरोपीचा शोध घेत आहे.