(Photo Credit - Twitter)

मागील काही दिवसांपासून चेन्नईमध्ये (Chennai) मुसळधार पाऊस सुरू आहे. चेन्नईत मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली  तर काही उपनगरांत रात्रभर कोसळलेल्या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. गुरुवारी झालेल्या  मुसळधार पाऊसात चेन्नईतील टीपी चतरम भागातील स्मशानभूमीत बेशुद्ध पडलेल्या एका व्यक्तीला वाचवताना महिला पोलिस निरीक्षक राजेश्वरीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये महिला पोलिस निरीक्षक त्या व्यक्तीला तिच्या खांद्यावर घेऊन ऑटोमध्ये जवळच्या हॉस्पिटलमध्ये जाताना दिसत आहेत. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पोलीस निरीक्षक राजेश्वरी यांच्या निस्वार्थ कृत्याबद्दल सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

28 वर्षीय व्यक्ती स्मशानभूमीत बेशुद्ध अवस्थेत आढळून आली होती, कारण गुरुवारी तामिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पाऊसामुळे चेन्नईच्या अनेक भागात पूर आला. एग्मोर आणि पेरांबूर सारख्या ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याचे पोलिसांनी सांगितले. तमिळनाडू मध्ये झालेल्या आतिवृष्टी मुळे मोठ्याप्रमाणे नुकसान झाले आहे. तामिळनाडूच्या महसूल विभागाचे प्रधान सचिव कुमार जयंत यांनी सांगितले की, पावसाशी संबंधित घटनांमध्ये शनिवारपासून 12 जणांचा मृत्यू झाला आहे. हे ही वाचा (दिल्लीत वाढत्या हवेच्या प्रदुषणामुळे पर्यावरण विशेषज्ञांनी व्यक्त केली चिंता, Health Emergency सांगत शाळा बंद करण्याचा दिला सल्ला.)

हवामान खात्यानुसार, 11 आणि 12 नोव्हेंबर रोजी राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होऊ शकते. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून त्यामुळे अतिवृष्टीसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. चेन्नईमध्ये संकटात सापडलेल्या आज 1,52,451 लोकांना फूड पॅकेटचे वाटप करण्यात आले आहेत.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले एक दाब गुरुवारी संध्याकाळी उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण आंध्र प्रदेश दरम्यानचा किनारा ओलांडून चेन्नई आणि त्याच्या उपनगरात मुसळधार ते अतिवृष्टी करेल अशी शक्यता नोंदवली जात आहे.