Woman Bit Off Mans Ear : बापरे! रागाच्या भरात महिलेने शाजाऱ्याच्या कानाच लचकाच तोडला; आग्रा शहरातील विचीत्र घटना
Crime (PC- File Image)

 

Woman Bit Off Mans Ear : प्रेमाचं प्रतीक असलेला‘ताजमहाल’हा आग्रा शहरात आहे. मात्र, गेल्या काही काळापासून तिथेही गु्न्ह्यांच्या घटना (crime news) वाढल्या आहेत. आता अशीच एक हैराण करणारी घटना आग्र्यातून (Agra) समोर आली आहे. जिथे एका महिलेने युवकाच्या कानाचा थेट लचकाच तोडला. धक्कादायक गोष्ट म्हणजे, त्या युवकाच्या तक्रारीनंतर पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी त्या महिलेकडे कानाचा तो भाग परत मागितला. त्यावर महिलेने जे केले त्याने सगळ्यांना धक्का बसला. महिनेले मागचा - पुढचा विचार न करता पोलिसांसमोरच कानाचा तो तुकडा चावून, गिळून (Woman ate Mans Ear) टाकला. तिच्या या कृत्याने पोलिसही हैराण झाले आहेत. या घटनेनंतर महिलेविरोधात तक्रार दाखल झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत. ( हेही वाचा : Pune Crime News: पुरंदरमध्ये दोन गटात फ्री स्टाईल मारामारी, एकाने गमावला जीव, तीन जण जखमी )

4 मार्च रोजी ही घटना घडली. गेट न बंद करण्याच्या क्षुल्लक मुद्यावरून आधी त्यांच्यात वाद झाला. पीडित युवक आणि आरोपी महिला हे दोघेही शेजारी राहतात. ते भाड्याच्या घरात कुटुंबियांसह राहतात. मात्र त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर वाद इतका वाढला की रागाच्या भरात संतप्त महिलेने मागचा-पुढचा काहीच विचार केला नाही, आणि तिने दातांनी त्या युवकाच्या कानाचा लचका तोडला. या घटनेमुळे आजूबाजूला उभे राहीलेले इतरही लोक काहीकाळ आवाक झाले.( हेही वाचा: Badlapur Crime: तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला, रुगणालयात उपचार सुरु, बदलापूरात मोठी खळबळ )

न्यू आग्रा येथील देवी नगर भागात रामवीर बघेल राहतो. तो कुटुंबियांसह रविंद्र यादव याच्या मोठ्या घरात, भाड्याने खोली घेऊन राहतो. त्याच्या व्यतिरीक्त अनेक कुटुंब तिथे खोल्यांमध्ये राहतात. कुटुंबाच पालनपोषण करण्यासाठी तो ई-रिक्षा चालवतो. आरोपी महिलाही त्याच्या घराच्या बाजूला राहते. मात्र, तिला इतरांवर अरेरावी करण्याची सवय आहे. राखी असे त्यामहिलेचे नाव आहे. तिला सर्वांवर रुबाब दाखवण्याची सवय आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवरून तिचं इतरांशी सतत भांडण ही व्हायच.

रामवीर बघेल यांच्या मुलाची परिक्षा सुरू होती. तसेच त्या दिवशी तो घाईघाईत मेन गेट नीट लावायला विसरला, आणि निघून गेला. त्यावर राखी हिने रामवीर याच्याशी वाद घालायला सुरूवात केली. वादादरम्यान, त्याने तिला बरंच समजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती काही केल्या शांत होत नव्हती. त्यांचात वाद वाढला आणि संतापाच्या भरात राखी हिने रामवीर याच्या कानाचा थेट लचकाच तोडला आणि तो गिळूनही टाकला. याप्रकरणी रामवीरच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू आहे.