Pune Crime News: पुण्यातून आणखी एक खळबळजनक घटना समोर आली आहे. दोन गटात हाणामारी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले आहे. पुण्यातील पुरंदर तालुक्यातील रावडेवाडी इथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. दोन गटात वाद झाला आणि या वादाचे रुपांतर मारामारीत झाले. हा वाद कशा मुळे सुरु झाला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील पुरंदर तालुक्यात रावडेवाडी येथे दोन गटात वाद झाला. हा वाद इतक्या टोकाला गेला अखेर त्यांच्या मारामारी झाली. या मारामारीत एका तरुणाने प्राण गमावला. सचिन दिलीप रावडे असं या मृत तरुणाचे नाव आहे. त्याने जागीच जीव सोडला. तर आणखी तीन जण जखमी झाले. यश राजेंद्र रावडे, तानाजी निवृत्ती रावडे आणि ओमकार रावडे हे तिघे जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले आहे.
पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतला. पोलिसांनी आरोपीला पकडण्यासाठी विशेष पथक नेमले आहे. या प्रकरणात पोलीसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. परिसरातील उपविभागीय पोलीसा अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करण्यात आली. आरोपीवर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. हत्येचं कारण अद्यापही अस्पष्ट असल्याने सासवड पोलीस तपास करत आहे.