
देशातील सध्या सुरू असलेल्या कोरोना संकटात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी रविवारी आरोग्य तज्ञांशी आभासी बैठक घेतली. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत मोठा निर्णय घेऊ शकतात, असं सूत्रांनी सांगितले आहे. वृत्तानुसार, एमबीबीएस आणि नर्सिंगमधील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना कोविड ड्युटीसाठी तैनात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET देखील रद्द करण्यात येऊ शकते.
त्याशिवाय एमबीबीएस अंतिम वर्षाची परीक्षा लवकरचं घेतली जाऊ शकते. जेणेकरून कोविड ड्युटीमध्ये जास्तीत जास्त आरोग्य कर्मचारी तैनात करता येतील. तथापि, बैठकीदरम्यान झालेल्या चर्चेसंदर्भातील अंतिम निर्णय उद्या म्हणजेचं सोमवारी घेतला जाऊ शकतो. (वाचा - दिल्लीत कोविडच्या रुग्णांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी अतिरिक्त शुल्क आकारणाऱ्या रुग्णवाहिकेच्या चालकाला अटक)
बातमीनुसार कोविड ड्युटीमध्ये तैनात करण्यात आलेल्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरकारकडून प्रोत्साहन म्हणून शुल्क दिले जाईल. मात्र, अद्याप या निर्णयाबाबत अंतिम निर्णय झालेला नाही.
दरम्यान, सध्या देशात कोरोना विषाणूची दुसरी लाट गेल्या काही दिवसांपासून कहर निर्माण करीत आहे. शनिवारी देशात चार लाखांवर नवीन प्रकरणे नोंदली गेली. दरम्यान, ऑक्सिजन आणि औषधांच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज बैठक घेतली. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता या बैठकीस पंतप्रधानांनी तज्ज्ञांशी औषध आणि ऑक्सिजनची उपलब्धता यावर चर्चा केली.