Madhya Pradesh HC: मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने अलीकडेच एका महिलेची घटस्फोट याचिका मंजूर केली आहे. जिच्या पतीला मालमत्तेच्या वादातून स्वतःच्या वडिलांचा खून केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आणि जन्मठेपेची शिक्षा झाली. महिलेला घटस्फोट मंजूर करताना न्यायमूर्ती विवेक रुसिया आणि न्यायमूर्ती राजेंद्र कुमार वाणी यांच्या खंडपीठाने सांगितले की, पत्नी किंवा पतीला दोषी ठरवून घटस्फोट देण्याची तरतूद नसली तरी अशा प्रकरणांमध्ये घटस्फोटाची तरतूद आहे. यात मानसिक क्रूरतेचे कारण दिले जाऊ शकते. न्यायालयाने म्हटले आहे की, "पतीला दोषी ठरवून त्याला आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत जन्मठेपेची शिक्षा दिल्याने त्याचा परिणाम पत्नीवर मानसिक रित्या देखील होतो. ज्यामुळे तिला पतीपासून घटस्फोट घेता येऊ शकते." (हेही वाचा:HC On Register Marriage: आंतरधर्मीय जोडपी धर्मांतर न करता विवाह नोंदणी करू शकतात; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय )
न्यायमूर्ती विवेक रुसिया आणि न्यायमूर्ती राजेंद्र कुमार वाणी यांच्या खंडपीठाने सांगितले की, पत्नी किंवा पतीला दोषी ठरवून घटस्फोट देण्याची तरतूद नसली तरी मानसिक क्रूरतेमुळे अशा प्रकरणांमध्ये दिलासा दिला जाऊ शकतो.
या प्रकरणात, 2011 मध्ये या जोडप्याचे लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी आहे. 2020 मध्ये, महिलेने घटस्फोटासाठी ग्वाल्हेर येथील कौटुंबिक न्यायालयात धाव घेतली होती. 2019 मध्ये महिलेच्या पतीला हत्येसाठी दोषी ठरवण्यात आले होते. तिने पतीचे वर्तन क्रूर आणि आक्रमक असल्याचा आरोप देखील केला होता. कौटुंबिक न्यायालयाने गेल्या वर्षी घटस्फोटासाठी महिलेची याचिका फेटाळून लावली होती. खून प्रकरणातील पती महिलेवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार करत असल्याचा कोणताही पुरावा नसल्याचे कारण देत याचिका फेटाळली होती.