Marriage (PC - Pixabay)

HC On Register Marriage: आंतरधर्मीय विवाहावर अलाहाबाद उच्च न्यायालयाने (Allahabad High Court) महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. धर्म बदलल्याशिवाय आंतरधर्मीय विवाह (Interfaith Marriage) होऊ शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. विशेष विवाह कायद्यांतर्गत आंतरधर्मीय विवाह हे धर्म परिवर्तनाशिवाय वैध आहे. उच्च न्यायालयाने लिव्ह इन रिलेशनशिप (Live in Relationship) मध्ये राहणाऱ्या जोडप्याला लग्न करण्याची परवानगी दिली. या जोडप्याला सुरक्षा पुरवण्याचे निर्देशही न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत.

न्यायालयाने सांगितले आहे की, पुढील सुनावणीच्या दिवशी दोघेही लग्न केल्यानंतर पुरवणी प्रतिज्ञापत्रासह कागदोपत्री पुरावे सादर करतील. हापूर पंचशील नगर येथील एक तरुणी आणि तरुण लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असताना त्यांनी संरक्षणासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. दोघांनी लग्नासाठी निर्धारित किमान वय पूर्ण केले असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा -Marriage Between Hindu-Muslim Not Valid: हिंदू-मुस्लिम यांच्यातील विवाह मुस्लिम कायद्यानुसार वैध नाही; मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने आंतरधर्मीय जोडप्यांना पोलिस संरक्षण देण्यास दिला नकार)

त्यांना एकमेकांचे धर्मांतर न करता पती-पत्नीसारखे जगायचे आहे. सध्या दोघेही लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. विशेष विवाह कायद्यांतर्गत त्यांना एकमेकांशी लग्न करायचे होते, मात्र नातेवाईकांकडून सतत धमक्या येत असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले होते. (हेही वाचा -Kanyadaan Not Necessary For Hindu Marriage: हिंदू विवाह सोहळ्यासाठी 'कन्यादान' आवश्यक नाही, सप्तपदी महत्वाची- High Court)

अशा परिस्थितीत, जोपर्यंत त्यांना संरक्षण दिले जात नाही, तोपर्यंत ते विशेष विवाह कायद्याच्या तरतुदीनुसार लग्न करू शकत नाहीत. न्यायमूर्ती ज्योत्स्ना शर्मा यांच्या एकल खंडपीठाने हे आदेश दिले आहेत.