शुक्रवारी संध्याकाळी द्वारका (Dwarka) येथे आपल्या नऊ वर्षांच्या मुलीसमोर पत्नीची (Wife) चाकूने भोसकून हत्या (Murder) करणाऱ्या सरकारी शाळेतील शिक्षकाला दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) शनिवारी अटक (Arrested) केली. आरोपीचे नाव संजय असे असून तो मूळचा जम्मूचा आहे, असे पोलिसांनी सांगितले. पोलिस उपायुक्त (द्वारका) हर्षवर्धन यांनी सांगितले की, संजय आणि त्याची पत्नी नीरा यांच्यात शुक्रवारी संध्याकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली, ज्यात ती गंभीर जखमी झाली. पोलिस जेव्हा नवादा काकरोला (Nawada Kakarola) गृहसंकुलात पोहोचले. तेव्हा त्यांना नीरा मृत आणि संजय बेपत्ता आढळले. हेही वाचा Moonlighting Job: सावधान! दुहेरी नोकरी अथवा दीर्घकालीन कामाचा आरोग्यावर होऊ शकतो घातक परिणाम; अभ्यासकांचा सल्ला
त्यानंतर त्याला द्वारका मोर परिसरातून पकडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.डीसीपीने सांगितले की, सध्या नातेवाइकांकडे राहणाऱ्या त्यांच्या मुलीने भांडणाची पुष्टी केली. ज्यात आरोपीने पीडितेवर चाकूने वार केले. याप्रकरणी मोहननगर ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.